Monday, June 17, 2024
Homeताज्या घडामोडी2000 Rupees Notes: २००० रुपयांच्या तब्बल ८,२०२ कोटी किंमतीच्या नोटा अजूनही चलनात!

2000 Rupees Notes: २००० रुपयांच्या तब्बल ८,२०२ कोटी किंमतीच्या नोटा अजूनही चलनात!

मुंबई : मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ५०० व १००० च्या नोटा बंद करुन दोन हजार रुपयांची नोट चलनात आली होती. मात्र सात वर्षानंतर दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी चलनातून बाहेर काढण्यात आलेल्या नोटा ११ महिने उलटले तरीही २००० रुपयांच्या हजारो कोटींच्या नोटा अजूनही चलनात असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितले आहे.

आरबीआयने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, चलनातून बाहेर काढण्यात आलेल्या २००० रुपयांच्या गुलाबी नोटांपैकी सुमारे ९७.६९ टक्के नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत. मात्र परत न केलेल्या २.३१ टक्के नोटा अजूनही लोकांकडे आहेत. तर या उर्वरित नोटांची किंमत तब्बल ८,२०२ कोटी रुपये आहे. इतक्या नोटा अद्यापही बँकेकडे प्राप्त झाल्या नसून त्या अजूनही बाजारात असल्याचा दावा केला आहे.

अजूनही २००० रुपयांच्या नोटा जमा करु शकाल

चलनातून बाहेर काढलेल्या गुलाबी नोटा स्थानिक बँकांमध्ये स्वीकारल्या जाणार नाहीत. पण अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ या १९ आरबीआय कार्यालयांमध्ये जमा केल्या जातील. तर, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटणा व तिरुअनंतपुरम येथे जाण्याव्यतिरिक्त लोक या नोटा जवळपासच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून इंडिया पोस्टद्वारे जमा करु शकतील असे केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -