चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी मौल्यवान पाचू रत्नाचे शिवलिंग जप्त केले आहे. पोलिसांनी तंजावुर येथील एका लॉकरमधून आठ फुटाचं शिवलिंग जप्त केले आहे. ज्या व्यक्तीच्या लॉकरमधून शिवलिंग जप्त करण्यात करण्यात आलं, त्याची सध्या चौकशी सुरु आहे. हे शिवलिंग कुठून आले याचा शोध सध्या तामिळनाडू पोलीस घेत आहेत. याशिवलींगाचे बाजारमूल्य 500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आलेय.
पोलीस अधिकारी जयंत मुरली यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुरुवारी तंजावुर येथील एका लॉकरमधून पाचू रत्नाचे शिवलिंग जप्त केले. हे शिवलिंग नेमके आले कुठून, याबाबतची चौकशी सध्या सुरु आहे. ज्या व्यक्तीच्या लॉकरमधून शिवलिंग जप्त करण्यात आले, त्याची सध्या चौकशी सुरु आहे. बँक लॉकरमध्ये कोट्यवधी रुपयांचे पाचू रत्नाचे शिवलिंग असल्याची माहिती तामिळनाडू पोलिसांना मिळाली होती. त्याआधारावर पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत शिवलिंग ताब्यात घेतले. तंजावुर येथील एका घरात अनेक प्राचीन मूर्ती ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी समजले होते.
पोलिसांनी एन.एस. लिंगमचे मालकाची चौकशी केली. त्यानंतर कारवाई करत पाचू रत्नाचे शिवलिंग ताब्यात घेतले. पोलिसांनी पाचू रत्नाच्या शिवलिंगाबाबत अधिक तपास केला असता त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. हे शिवलिंग 2016 मध्ये नागपट्टिनम जिल्ह्यातील थिरुकुवलाईमधील शिव मंदिरातून चोरीला गेले होते. या शिवलिंगाची किंमत तब्बल 500 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसने आज उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा केली.…
मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाचा निर्णय मुंबई : मतदान (Voting) हा प्रत्येक नागरिकाचा हक्क…
दहा दिवसांनंतर समोर आली मोठी अपडेट नवी दिल्ली : 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (LS polls) पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून,…
नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने येथील दलित…
नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या…