Nandurbar : सध्या राज्यभर गाजत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थात एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या (Drug Inspector) परीक्षेतील कथित पेपरफूट प्रकरणाचा तपास आता नंदुरबारपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेचे (Mumbai Crime Branch) पथक नंदुरबारमध्ये दाखल झाले असून, संशयित अमृत पाटील आणि गौरव पाटील यांच्या घरांसह कौटिल्य अकॅडमीचीही पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Nandurbar Crime News)
कौटिल्य अकॅडमीसह संशयितांच्या घरांवर झाडाझडती
गेल्या काही महिन्यांपासून नंदुरबार विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आता एमपीएससीच्या पेपरफूट प्रकरणामुळे नंदुरबार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबईत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मुंबई गुन्हे शाखेचे पथक (Mumbai Crime Branch) नंदुरबारमध्ये दाखल झाले आणि संबंधित ठिकाणी तपासणी केली. गुन्हे शाखेच्या पथकाने कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्या घराची तसेच अकॅडमीच्या परिसराचीही तपासणी केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील हे देखील पोलिसांच्या पथकासोबत उपस्थित असल्याचे समोर आले आहे. (Nandurbar Crime News)
पुणे : पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पाय कॅमेरा असलेल्या ...
गुन्हा दाखल, संशयित ताब्यात
एमपीएससीमार्फत २२ मार्च रोजी औषध निरीक्षक(Drug Inspector) , गट-ब पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एमपीएससीशी संबंधित अधिकाऱ्यांसह नंदुरबारमधील कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील आणि अन्य संशयितांना अटक करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कशा पद्धतीने बाहेर आली? प्रश्नपत्रिकेची माहिती कोणाकोणापर्यंत पोहोचली? या संपूर्ण प्रकरणात नंदुरबारमधील संबंधित व्यक्तींची नेमकी भूमिका काय होती? यासह पेपरफूट प्रकरणातील इतर महत्त्वाच्या बाबींचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे. (Nandurbar Crime News)
नवी दिल्ली : UGC NET जून २०२६ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTAने शुक्रवारी रात्री ८४ विषयांचे निकाल जाहीर केले. उमेदवारांना ...
मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु
दरम्यान, नंदुरबारमध्ये करण्यात आलेल्या या झाडाझडतीदरम्यान पोलिसांच्या हाती नेमके कोणते साहित्य, कागदपत्रे किंवा इतर पुरावे लागले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे गुन्हे शाखेच्या तपासात आणखी काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारवाईमुळे एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या कथित पेपरफूट प्रकरणाचे धागेदोरे नंदुरबारपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या तपासातून या प्रकरणातील आणखी कोणती नावे समोर येतात आणि पेपरफूटचा संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा उलगडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





