Wednesday, August 26, 2026

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत असून, वाल्मिकीनगर गंडक बॅरेज येथे पाण्याचा प्रवाह सुमारे 81 हजार क्युसेकपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातील पुराचा संभाव्य धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. (Gandak River)

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात यापूर्वी अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. तिबेट सीमेजवळ झालेल्या भूकंपानंतर पर्वत आणि बर्फाचा मोठा भाग नदीत कोसळल्याने नदीचा प्रवाह काही काळ अडवला गेला. त्यामुळे नैसर्गिक धरणासारखी स्थिती निर्माण झाली होती. पाण्याचा दबाव वाढल्यानंतर हे तात्पुरते अडथळे फुटल्याने नदीच्या वरच्या भागात अचानक पूर आला.

नदीकाठच्या जिल्ह्यांना सर्तकतेचा इशारा

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन बिहार सरकार आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने गंडक नदीकाठच्या जिल्ह्यांना सतर्क केले होते. पश्चिम चंपारणसह संवेदनशील भागात बंधाऱ्यांवर देखरेख वाढवण्यात आली होती, तर मदत आणि बचाव पथकांनाही सज्ज ठेवण्यात आले होते. (Bihar)

आता गंडक नदीची पाणीपातळी ओसरल्याने प्रशासन आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र, परिस्थितीवर प्रशासनाकडून अद्यापही बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >