पालघर : पालघर जिल्ह्यातील सातपती रोड परिसरात एका बंद फ्लॅटमध्ये ३० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पूजा मिश्रा असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती चंदन मिश्रा सध्या बेपत्ता आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पूजा मिश्रा या सातपती रोड परिसरातील घोडेला गार्डनजवळील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २०१मध्ये पतीसोबत राहत होत्या. त्यांच्या लग्नाला सुमारे सहा वर्षे झाली होती. पूजा एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे मुंबई : महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक ...
२२ ऑगस्ट रोजी रात्री पूजा यांचा भाऊ प्रदीप कुमार मिश्रा यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला फोनला प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. त्यामुळे भाऊ सुरतहून पालघरला आला. घरी पोहोचल्यानंतर फ्लॅट बाहेरून बंद असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याचवेळी घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने त्याला संशय आला. त्याने तातडीने ११२ क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. फ्लॅटचे कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला असता पूजा यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पूजाचा पती चंदन मिश्रा हा घटनेनंतरपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. त्याच्याशी संपर्क होत नसल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या ...
पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली असून, पूजांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. महिलेच्या मृत्यूमागे घातपात आहे का, हा प्रश्न उपस्थित होत असला तरी पोलिसांनी अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. पतीची भूमिका आणि मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.




