Thursday, August 20, 2026

Nashik : महापालिकेच्या पाच समित्यांवर प्रत्येकी ९ सदस्यांची निवड, महिला व बाल कल्याणसह विविध समित्यांची घोषणा

Nashik : महापालिकेच्या पाच समित्यांवर प्रत्येकी ९ सदस्यांची निवड, महिला व बाल कल्याणसह विविध समित्यांची घोषणा

Nashik : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिकेच्या विविध समित्यांवरील सदस्यांची निवड करण्यात आली आहे. महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती, वैद्यकीय व साहाय्य समिती, विधी समिती तसेच शिक्षण समितीच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड झाली आहे. (Nashik News)

महिला व बाल कल्याण समिती : चित्रा तांदळे, भारती धिवरे, स्वाती भामरे, कोमल मेहेरोलिया, रुपाली निकुळे, ज्योती जोंधळे, इंदुमती नागरे, प्रमिला मैद आणि सीमा ठाकरे यांची निवड झाली आहे.

शहर सुधारणा समिती : रुपाली ननावरे, उषा बेंडकोळी, श्वेता भंडारी, जयंत जाचक, संध्या कुलकर्णी, प्रवीण जाधव, प्रमोद पालवे, योगेश भोर आणि जागृती गांगुर्डे यांचा समावेश आहे.

वैद्यकीय व साहाय्य समिती : वाळू काकड, सविता काळे, राहुल शेलार, साधना मटाले, सतीश निकम, डॉ. पूनम महाले, नितीन दातीर, वैशाली दळवी आणि डॉ. हेमलता पाटील यांची निवड झाली आहे.

विधी समिती : जुई शिंदे, अंकिता शिंदे, विश्वास नागरे, राजू आहेर, भूषण राणे, कविता नाईक, आशा तडवी, संजीवनी हंडोरे आणि मुकेश सहाणे यांची निवड झाली आहे.

शिक्षण समिती : छाया देवांग, सोनाली भांडूरे, सचिन मराठे, शरद मोरे, शरद फडोळ, नयना जाधव, कैलास मुदलीयर, सीमा पवार आणि किरण राजवाडे यांचा समावेश आहे.

महापालिकेच्या कामकाजात या समित्यांना महत्त्वाची भूमिका असते. संबंधित विषयांवरील धोरणात्मक निर्णय, प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा आणि विविध विकासकामांबाबत समित्यांच्या माध्यमातून चर्चा व निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे नव्याने निवड झालेल्या सदस्यांकडून त्यांच्या समित्यांच्या माध्यमातून प्रभावी कामकाजाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >