Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. पोलीस दलात भरती होऊन स्वतःचं आणि कुटुंबाचं स्वप्न साकार करण्यासाठी मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने तयारी करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने आयुष्य संपवलं आहे. अकॅडमी शिक्षकाच्या छळाला कंटाळून या तरुणीनं खाकीचं स्वप्न अपूर्ण ठेवत आयुष्याचा दोर कापला आहे. ही घटना 10 ऑगस्ट रोजी आळेफाटा येथे घडली असून भाग्यश्री भास्कर भंडारी (Bhagyashree Bhaskar Bhandari) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सह्याद्री अकॅडमीचा शिक्षक मयुर अशोक डुंबरे (Mayur Ashok Dumbre) (रा. खामुंडी, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahilyanagar Crime News)
मुंबई: भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा झाल्यास, देण्यात येणाऱ्या व्याज दरांत सुधारणा. भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई ...
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाग्यश्री भंडारी ही मूळची आळकुटी (ता. पारनेर ) येथील रहिवासी असून, आळेफाटा येथे राहून पोलीस भरतीचा सराव करत होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रसंगात शिक्षक मयुर डुंबरे याला पोलीस ठाण्यात जावे लागले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून डुंबरे याने भाग्यश्री हिला टार्गेट करण्यास सुरुवात केली. वर्गात तसेच इतर विद्यार्थ्यांसमोर सतत अपमानास्पद वागणूक देणे आणि तिचा मानसिक छळ करणे सुरू होते. या रोजच्याच त्रासाला कंटाळून अखेर भाग्यश्रीने राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. (Ahilyanagar Crime News)
Yeola Paithani postage stamp : महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेची जगभर ओळख निर्माण करणाऱ्या नासिक जिल्ह्यातील येवला पैठणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा ...
पोलिसांत तक्रार, तपास सुरु
मयत भाग्यश्रीची बहीण शितल भंडारी ही स्वतः शासकीय सेवेत कार्यरत आहे. आपल्या बहिणीवर ओढवलेला हा प्रसंग पाहून त्यांनी तात्काळ कायदेशीर पावले उचलत आळेफाटा पोलिसांत (Alephata Police Station) फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक मयुर डुंबरे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला अटकेची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण भागातील हजारो तरुण-तरुणी आपले भविष्य घडवण्यासाठी आळेफाटा परिसरातील खाजगी अकॅडमींमध्ये दाखल होतात. मात्र, शिस्तीच्या नावाखाली होणारा मानसिक छळ आणि शिक्षकांची अरेरावी या घटनेमुळे समोर आली आहे.






