IRCTC : श्रद्धा, अध्यात्म आणि आरामदायी प्रवासाचा संगम अनुभवण्याची संधी आता भाविकांना मिळणार आहे. आयआरसीटीसीने भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेनद्वारे 'सप्त ज्योतिर्लिंग महायात्रा' (Sapta Jyotirlinga Mahayatra) जाहीर केली असून, या यात्रेत महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि घृष्णेश्वरसह सात ज्योतिर्लिंगांचे दर्शन एका प्रवासात घडणार आहे.
Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत घडलेल्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रकरणात पोलिसांनी ...
एकाच प्रवासात सात ज्योतिर्लिंगांचे दर्शन
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीने ११ दिवसांच्या विशेष महायात्रेची घोषणा केली आहे. ही विशेष भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन २५ सप्टेंबर २०२६ रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून (Safdarjung Railway Station) रवाना होणार आहे. या यात्रेदरम्यान भाविकांना उज्जैनचे महाकालेश्वर, ओंकारेश्वर, गुजरातमधील नागेश्वर आणि सोमनाथ तसेच महाराष्ट्रातील भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि अखेरीस नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार आहे. याशिवाय चार धामांपैकी एक असलेल्या द्वारकाधीश मंदिराचाही (Dwarkadhish Temple) या प्रवासात समावेश करण्यात आला आहे.
Railway Alarm chain pulling : रेल्वेने मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये दिलेली 'अलार्म चेन पुलिंग' (ACP) ही सुविधा केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे. मात्र, अलीकडच्या काळात या ...
महाराष्ट्रातील तीन ज्योतिर्लिंग एकाच पॅकेजमध्ये
या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील तीन प्रमुख ज्योतिर्लिंगांचा एकाच पॅकेजमध्ये समावेश. यात्रेचा समारोप त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे होणार असून, भाविकांना त्र्यंबकेश्वर मंदिरासह पंचवटी परिसरालाही भेट देता येणार आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरची धार्मिक ओळख आणखी अधोरेखित होण्यास या उपक्रमाची मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी एक्स्प्रेस (Coimbatore–Jaipur AC Express) १३ ऑगस्टपासून पुन्हा ...
भाविकांना सुविधा आणि शुल्क काय ?
या यात्रेत प्रवाशांसाठी एसी-३, एसी-२ आणि एसी-१ श्रेणीतील आधुनिक डबे, तीन-स्टार हॉटेलमधील मुक्काम, शाकाहारी भोजन, वातानुकूलित वाहनांमधून स्थानिक पर्यटन, प्रवास विमा तसेच आयआरसीटीसीचे टूर मॅनेजर्स यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत गौरव योजनेअंतर्गत (Bharat Gaurav Scheme) रेल्वेकडून सुमारे ३३ टक्के सवलत देण्यात आली असून, ती पॅकेजच्या शुल्कात समाविष्ट आहे. दुहेरी निवास व्यवस्थेसाठी एसी-३चे प्रति व्यक्ती शुल्क ९०,९३० रुपये, एसी-२चे १,०९,९२५ रुपये आणि एसी-१चे १,१९,४२५ रुपये इतके आहे.






