Friday, August 7, 2026

Teacher Recruitment 2026 : तरुणांसाठी खुशखबर! तब्बल 30 हजार शिक्षकांची भरती; 'या' पोर्टलवर सुरू झाली नोंदणी

Teacher Recruitment 2026 : तरुणांसाठी खुशखबर! तब्बल 30 हजार शिक्षकांची भरती; 'या' पोर्टलवर सुरू झाली नोंदणी

शिक्षक पदाच्या भरतीसाठी थेट लिंक आणि अंतिम तारीख; संपूर्ण डिटेल्स येथे वाचा

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमधील 30,209 रिक्त शिक्षक पदांची भरती 'पवित्र पोर्टल'च्या माध्यमातून अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील विविध पदांसाठी उमेदवारांना 6 ऑगस्ट 2026 पासून पसंतीक्रम (Preference) नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Teacher Recruitment 2026)

11 ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करणे बंधनकारक

शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, TAIT-2025 परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी अधिकृत पवित्र पोर्टलवर जाऊन 11 ऑगस्ट 2026 पर्यंत आपले पदनिहाय पसंतीक्रम निश्चित करून लॉक करणे अनिवार्य आहे. त्यानंतर मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या 19,881 पदांची पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ( Teacher Vacancy)

भरतीचा तपशील

राज्यातील विविध संस्थांमधील रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:
  • जिल्हा परिषद – 13,351 पदे
  • महानगरपालिका – 1,954 पदे
  • नगर परिषद / नगरपालिका – 280 पदे
  • खासगी शैक्षणिक संस्था – 12,148 पदे
  • आदिवासी विकास विभागाच्या शाळा – 2,421 पदे
  • शासकीय विद्यानिकेतन – 56 पदे
एकूण रिक्त पदे – 30,209 यापैकी:
  • 19,881 पदे – मुलाखतीशिवाय
  • 10,328 पदे – मुलाखतीसह

इयत्तानिहाय पदांची संख्या

  • इयत्ता 1 ते 5 – 14,320 पदे
  • इयत्ता 6 ते 8 – 10,012 पदे
  • इयत्ता 9 ते 10 – 5,513 पदे
  • इयत्ता 11 व 12 – 364 पदे

TAIT परीक्षेची आकडेवारी

  • नोंदणी केलेले उमेदवार – 2,28,808
  • परीक्षेला बसलेले उमेदवार – 2,11,308
  • स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केलेले उमेदवार – 1,70,108

महत्त्वाच्या सूचना

  • अधिकृत पोर्टलवर जाऊन पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून 11 ऑगस्ट 2026 पूर्वी लॉक करणे आवश्यक आहे.
  • मुदत संपल्यानंतर पसंतीक्रमात कोणताही बदल करता येणार नाही.
  • भरती प्रक्रियेसंदर्भातील सूचना, अडचणी किंवा तक्रारी edupavitra25@gmail.com या ई-मेलवर पाठवता येतील.
ही भरती प्रक्रिया गुणवत्ताधारित आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून, राज्यातील हजारो पात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >