Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणात बुधवारी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस वाहतूक आणि नियोजनासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत कुंभमेळ्यातील भाविकांच्या वाहतुकीसाठी बस संचालन, संपर्क व्यवस्था आणि गतिशीलता नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. (Nashik Simhastha Kumbh Mela)
Simhastha Kumbh Mela 2027 : आगामी सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विकासकामांचा धडाका सुरु आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वे स्थानक ...
बससेवेच्या नियोजनाचा आढावा
बैठकीत नाशिक-त्र्यंबकेश्वर, शिर्डी-शनी शिंगणापूर, अहिल्यानगर-शिर्डी, भीमाशंकर, टाकेद, सप्तशृंगी, घृष्णेश्वर आणि कवनई या प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या मार्गांवरील बससेवेच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. गर्दीच्या तसेच तुलनेने कमी गर्दीच्या कालावधीत बसफेऱ्यांचे नियोजन, ताफ्याची उपलब्धता आणि भाविकांच्या सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक कार्यपद्धती यावर चर्चा झाली. नाशिक विमानतळ, रेल्वे स्थानके आणि प्रमुख धार्मिक स्थळांदरम्यान बस संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबतही बैठकीत विचारमंथन झाले. प्रमुख तीर्थक्षेत्रांसाठी थेट एसटी सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाची व्यवहार्यता, विमान व रेल्वेच्या वेळापत्रकाशी बससेवेचे समन्वय, बसथांब्यांची ठिकाणे, प्रवासी सुविधा तसेच विमानतळ व रेल्वे स्थानकांवरील बस पायाभूत सुविधांच्या देखभाल व व्यवस्थापनासंदर्भात विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. (Nashik Simhastha Kumbh Mela)
Jalgaon Gold Rate : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Gold Market) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने थोडेफार चढउतार सुरु होते. मात्र, बुधवारी ...
बसमध्ये भाविकांसाठी माहितीपर शॉर्ट व्हिडिओ
याशिवाय मार्गनिहाय प्रवासी मागणीचा उगम-गंतव्य (ओरिजिन-डेस्टिनेशन) अभ्यास, पार्किंग क्षेत्रे व रेल्वे स्थानक परिसरातील पायाभूत सुविधा, प्रवाशांसाठी पिक-अप व ड्रॉप-ऑफ व्यवस्था, प्रवासी हालचालींचे नियोजन आणि बस टर्मिनल व्यवस्थापन याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. बाह्य वाहनतळांपासून अंतर्गत पार्किंगपर्यंत धावणाऱ्या शटल बसमध्ये भाविकांसाठी शॉर्ट व्हिडिओ दाखविण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. या माहितीपटांद्वारे मार्गांची माहिती, महत्त्वाची धार्मिक स्थळे, सुरक्षा सूचना, आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक, वाहतूक व्यवस्था तसेच भाविकांसाठी आवश्यक अन्य उपयुक्त माहिती उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडण्यात आली. (Nashik Simhastha Kumbh Mela)
Nashik : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) निर्णायक पाऊल उचलले आहे. महापौर ...
१५ दिवसांनंतर पुन्हा आढावा बैठक
बैठकीच्या शेवटी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व संबंधित विभागांना बैठकीत झालेल्या चर्चेनुसार प्रस्तावांचा सविस्तर अभ्यास करून आवश्यक सूचना समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. तसेच या नियोजनाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी १५ दिवसांनंतर पुन्हा आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह परिवहन विभाग, रेल्वे, पोलीस, नाशिक महानगरपालिका, सिटीलिंक तसेच संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.






