Monday, August 3, 2026

Nashik : हरणबारी धरणावरील स्टंटबाजी जीवावर बेतली ! एकाचा मृत्यू , एक थोडक्यात बचावला

Nashik : हरणबारी धरणावरील स्टंटबाजी जीवावर बेतली ! एकाचा मृत्यू , एक थोडक्यात बचावला

Nashik : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहे. धरणं देखील ओसांडून वाहायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हिरवाईने नटली आहे. त्यामुळे धरण परिसर , डोंगर यांच्याकडे पर्यटक फिरण्यासाठी मोठी गर्दी करत आहे. मात्र अशातच जीवघेणी स्टंटबाजी आणि एका पर्यटकाच्या जीवावर बेतली आहे.

एकाचा मृत्यू , एक थोडक्यात बचावला

नाशिक जिल्ह्यातील सटाणा (Satana) तालुक्यातील हरणबारी धरणावर (Haranbari Dam) अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर एकाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. पण घडलेल्या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. हरणबारी धरण (Haranbari Dam) पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. त्यामुळे या ठिकणी पर्यटक मोठी गर्दी करत आहे. मात्र याठिकाणी एकाच मृत्यू झाला आहे.

टायरची ट्यूब काढण्यासाठी पाण्यात उडी मारली अन्...

सांडव्यात अडकलेली टायरची ट्यूब काढण्यासाठी विजय महादू सोनवणे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात अडकून बुडाला. त्यांला वाचवण्यासाठी दुसऱ्या एका तरुणानेही पाण्यात उडी घेतली. तो देखील खोल पाण्यात अडकला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर दोरीच्या साहाय्याने दुसऱ्या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेत तो सुदैवाने बचावला आहे. मात्र विजय महादू सोनवणे (Vijay Mahadu Sonawane) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

धोकादायक स्टंटबाजी टाळा

दरम्यान, विजय महादू सोनवणे यांचा मृतदेह सांडव्यापासून काही अंतरावर शोधण्यात आला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धरण परिसरात धोकादायक स्टंटबाजी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >