समुद्र खारट का असतो

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील


मंदिरात आराम झाल्यावर त्यांच्या गोष्टी छान सुरू झाल्या होत्या.
“ हिमनग व हिमगिरी हे वेगवेगळे असतात काय?” कुणालने विचारले. “हो.” शिवम सांगू लागला.


“हिमपर्वतावरून खाली घसरत जाणा­ऱ्या व उतारावरून वाहणाऱ्या बर्फाच्या मोठमोठ्या लाद्यांना हिमनदी म्हणतात. जेव्हा हिमगिरीवरील बर्फ त्याच्या उताराने घसरते व वाहू लागते तेव्हा त्याची हिमनदी बनते. त्या हिमनदीत असे बर्फाचे थरावर थर बनतात व त्यांच्या बर्फाच्या प्रचंड शिळा बनतात. त्या हिमनदीतून वाहत वाहत समुद्रात येतात. त्यांना हिमराशी किंवा हिमनग म्हणतात. तेही पर्वताप्रमाणेच दिसतात म्हणून त्यांना हिमनग म्हणतात; परंतु हिमगिरी म्हणजे हिमपर्वत किंवा बर्फाचा पर्वत. हिमगिरी हा हिमालय पर्वतासारखा स्थिर असतो.”


शिवम पुढे सांगू लागला, “हिमनगांचा आकार २ ते ३ किलोमीटर लांब व रुंद आणि १०० ते १५० मीटर उंच असतो. हिमनग जरी खूप मोठे असतात तरी ते घनतेने कमी असल्याने पाण्याहून हलकेच असतात. त्यामुळे समुद्राच्या पाण्यावर ते तरंगत लाटांसोबत वाहतात. काही कालावधीनंतर त्यातील सर्व बर्फ वितळून तो समुद्राच्या पाण्यात मिसळून जातो. असे हिमनग हे फक्त दहा टक्केच पाण्यावर दिसतात व नव्वद टक्के ते पाण्याच्या आत असतात. त्यामुळे ते आकाराने किती मोठे आहेत हे समजू शकत नाही. म्हणून ते जहाजांना खूपच धोक्याचे असतात. तुम्हाला टायटॅनिक जहाजाबद्दल माहिती असेलच.


“हो. बरोबर आहे. आता आठवले मला. ते जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाज अतिशय वेगाने समुद्रावरून जात असताना त्याच्या कप्तानाला समोर दिसलेल्या हिमनगाचा पूर्णत: अंदाज आला नाही. त्यामुळे ते टायटॅनिक जहाज त्या समोरच्या हिमनगावर आदळून फुटले व समुद्रात बुडाले. नंतर त्याचा खूप शोध घेतला पण त्याचा पत्ताही लागला नाही.” कौशलने सांगितले.


“समुद्र खारट असतो मुलांनो. तो का असतो हे तुम्हाला माहीतच असेल.” यात्रेकरू बोलला. हो काका, विपुल म्हणाला, “नद्यांचे पाणी समुद्रात जाते. ते पाणी भूपृष्ठावरील क्षारसोबत वाहून नेते. ते क्षार समुद्राच्या पाण्यात मिसळतात.”
“तसेच समुद्रात सुद्धा ब­ऱ्याचदा ज्वालामुखींचे उद्रेक होत असतात. त्यांच्या राखेत अनेक क्षार असतात. तेही क्षार सागराच्या पाण्यात मिसळतात.” कौशल म्हणाला.


“त्याचप्रमाणे समुद्र वनस्पती व जलचरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरातील क्षार पाण्यात मिसळतात.” कपिलने माहिती पुरवली.
“उष्णतेने जरी समुद्राच्या पाण्याची वाफ होते तरी क्षारांचे बाष्पीभवन मात्र होत नसते. त्यानेही सागरामध्ये सदैव दररोज क्षारांचे प्रमाण वाढत असते.” अमोलने सांगितले.


“ह्या सा­ऱ्या क्षारांची विघटन प्रक्रिया समुद्रात सतत सुरू असते व ती क्रिया समुद्रात सदैव मीठ निर्माण करते. हे मीठ सागरी पाण्यात विरघळते. त्याने सागरजल खारट बनते.” कैवल्यने सांगितले.


“बरे मित्रांनो, मग थंडगार प्रदेशातील समुद्राच्या पाण्यावरचे बर्फ कसे असते?” शिवमने विचारले.
“अर्थात तेही खारटच असेल.” यात्रेकरू पटकन बोलला.
“नाही काका,” शिवम म्हणाला, “शीतल प्रदेशातील समुद्राच्या पाण्यावरचे बर्फ खारट नसते. त्याचे कारण असे की गार प्रदेशात समुद्राचे पाणी गोठते व त्याचे समुद्रावर बर्फ बनते; परंतु क्षार मात्र गोठत नसतात. ते तसेच पाण्यात खाली राहतात. म्हणूनच समुद्राचे पाणी जरी खारट असते तरी त्यावरील बर्फ मात्र खारट नसते.”


“मग समुद्र काय कामाचा आहे बेटा?” यात्रेकरूने प्रश्न केला.
“अहो काका,” शिवम म्हणाला, “सागरामध्ये वनस्पती व सागरी जीवांचे अवशेष असतात. त्यामुळे सागरात जीवाश्म इंधन खूप मोठ्या प्रमाणावर असते. खनिज तेलाचाही प्रचंड साठा असतो. काही उपयुक्त क्षारही खूप असतात. समुद्राची उष्णता साठविण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे समुद्र पृथ्वीवरील तापमान सौम्य करण्याचे काम करीत असतो. सागराच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते व त्या वाफेचे ढग बनून त्यांपासूनच आपल्या पृथ्वीवर पाऊस पडतो. समुद्रात अनेक रत्नेही सापडतात.”

Comments
Add Comment

अडगळ

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ दरवर्षीप्रमाणे मित्राच्या घरी होळीला गेलो. आम्ही सर्व कॉलेजचे मित्र एक एक सण

नदीची गोष्ट

- कथा; रमेश तांबे विजयला फिरण्याचं खूप वेड होतं. शाळेला सुट्टी असली की निघाला विजय फिरायला! पण त्याचं फिरणं होतं

ध्रुवांवर सतत बर्फ का असते

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील वम व त्याचे सोबती सहलीवर गेले होते. थकल्याने व जेवण झाल्याने ते महादेवाच्या

अतिलोभ म्हणजे विनाश !

लोभ हा सर्व पापांचे मूळ आहे आणि अतिलोभ हा विनाशाचे कारण ठरतो.”मानवाच्या गरजा मर्यादित असतात; परंतु इच्छा

झाड आणि रस्ता

कथा-रमेश तांबे रस्त्याच्या कडेला आंब्याचं एक झाड होतं. खूप मोठं डेरेदार. त्याला भरपूर फळं यायची. त्या झाडाच्या

दिव्यांग

प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ बाबा सामाजिक कल्याण क्षेत्रात नोकरीला होते. त्यांचे एम. ए. पर्यंत शिक्षण झालेले