PM Narendra Modi Viral video : मै उन्हें माफ...! जंतर-मंतरवरील घटनेनंतर पंतप्रधान मोदींचा 'तो' व्हिडिओ चर्चेत

दिल्ली: जंतर-मंतर येथे घडलेल्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naendra Modi) यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ संदेश शेअर केला आहे. या संदेशात त्यांनी घटनेवर प्रतिक्रिया देताना समाजाला संयम बाळगण्याचे आणि तरुणांना योग्य मार्ग दाखवण्याचे आवाहन केले आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, जंतर-मंतरवर जे घडले ते संपूर्ण देशाने आणि जगाने पाहिले. काही तरुणांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यात त्यांच्यासोबतच त्यांच्या दिवंगत आईबद्दलही अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले. ही घटना वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले. (Viral Video)





मात्र, या प्रसंगाकडे केवळ रागाच्या नजरेने न पाहता, त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. लहान वयात चुका होतात आणि त्या सुधारण्याची संधीही प्रत्येकाला मिळायला हवी, असे ते म्हणाले. समाजात या प्रकारामुळे निर्माण झालेला संताप समजू शकतो, पण अशा वेळी संयम ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. (PM Message)



 त्यांना योग्य दिशा दाखवा...


या तरुणांना शिक्षा करून किंवा त्यांचा छळ करून परिस्थिती बदलणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ही मुले भरकटली असली तरी त्यांना योग्य दिशा दाखवणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्यांना माफ करून पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (Jantar Mantar)


आपले विचार स्पष्ट करताना त्यांनी एक उदाहरणही दिले. कधी कधी जीभ दातांमध्ये अडकते आणि दुखापत होते, पण त्यामुळे आपण दात तोडत नाही. कारण दोन्ही आपलेच असतात. त्याचप्रमाणे देशातील तरुणही आपलेच आहेत. त्यामुळे त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


व्हिडिओच्या शेवटी पंतप्रधानांनी तरुणांना देशाच्या प्रगतीत सहभागी होण्याचे आवाहन केले. चुका मान्य करून त्यातून शिकावे, नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत घ्यावी, असे ते म्हणाले. देश सातत्याने प्रगती करत असून प्रत्येक तरुणानेही उज्ज्वल भविष्य घडवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


Comments
Add Comment

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)

Blast in Gujarat : गुजरातमध्ये वाहनाच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नखत्राणा : गुजरातमधील कच्छच्या नखत्राणा परिसरात शनिवारी एका छोटा हत्ती वाहनात अचानक झालेल्या जोरदार स्फोटात

UGC : अमली पदार्थविरोधी अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)

Cough Syrup Warning For Kids : लहान मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर बंदी

नवी दिल्ली : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्दी-खोकल्यावरील