Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) अनुषंगाने सुरू असलेल्या विविध विकासकामांदरम्यान पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation ) विशेष मोहीम हाती घेतली आहे. सर्व विभागांमध्ये अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरून कामांचा आढावा घेत आहेत. (Nashik News)
Earthquake in Nashik : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यात मागील आठवड्यापासून सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. काही धक्के दिंडोरीसोबतच पेठ, कळवण आणि ...
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिकेची युद्धपातळीवर मोहीम
महापौर हिमगौरी आडके (Mayor Himgauri Adke) , उपमहापौर विलास शिंदे (Deputy Mayor Vilas Shinde) आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप (Standing Committee Chairman Machhindra Sanap) हे विविध भागांना भेटी देऊन नागरिकांच्या सूचना जाणून घेत आहेत. स्थानिक नगरसेवक, विभागीय अधिकारी आणि संबंधित कर्मचारी यांच्या माध्यमातून तातडीने दुरुस्तीची कामे केली जात आहेत. महापालिकेकडून खड्डे भरणे, रस्त्यांची डागडुजी, चेंबर दुरुस्ती, ओघळी भरणे, तसेच मिनरल मटेरियल, वेट मिक्स, मुरूम, जीएसबी आणि कोल्ड मिक्सच्या माध्यमातून रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. (Nashik News)
Nashik : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत नाफेडमार्फत (NAFED) आणि ...
महापौरांकडून खड्डे दुरुस्तीच्या कामांची पाहणी
महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी गंगापूर रोडवरील खड्डे दुरुस्तीच्या कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना प्रभागातील सर्व खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना दिल्या. शहरातील पश्चिम, पंचवटी, पूर्व, नवीन नाशिक, सातपूर आणि नाशिक रोड या सहाही विभागांमध्ये समांतरपणे कामे सुरू आहेत. एनडीए–पटेल रोड, अण्णाभाऊ साठे चौक, पी.एन.टी. कॉलनी, धात्रक फाटा–कॅनॉल रोड, निलगिरी बाग परिसर, पखाल रोड, रविशंकर मार्ग, अमृतवर्षा कॉलनी, शिवाजीनगर, कामोद नगर–सामनगाव रोड, भोर मळा, पाटोळे मळा, रेवगडे चाळ, गायकवाड पंप परिसर, प्रशांत नगर, दामोदर नगर, दुर्गा नगर, उत्तम नगर, योगेश्वर नगर, आंबड, जगताप नगर, भाग्यश्री नगर, विजय नगर आणि शिवशक्ती नगर आदी भागांत खड्डे दुरुस्ती सुरू आहे.महापालिकेने नागरिकांना विकासकामांच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (Nashik News)
Jalgaon Rain Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसानं धुव्वाधार बॅटिंग केली असून यात अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढलं ...
मुंबईच्या धर्तीवर तंत्रज्ञान वापरा - आमदार देवयानी फरांदे
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता नाशिक शहर युद्धपातळीवर खड्डेमुक्त करण्याच्या सूचना आमदार देवयानी फरांदे यांनी दिल्या. मुंबईच्या धर्तीवर ‘मिस्टिक ॲस्फाल्ट’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांनी महापौर हिमगौरी अडके-आहेर आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमवेत शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी करून खड्ड्यांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व खड्डे तातडीने भरून काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी खड्डे भरण्याची कामे शक्यतो रात्रीच्या वेळी करण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.






