Nashik : नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून विसर्गात वाढ, गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून (Nandur Madhmeshwar Weir) सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या नाशिक पाटबंधारे विभागाने (Nashik Irrigation Department) शुक्रवारी (३१ जुलै) सायंकाळी ६ वाजता याबाबत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.



नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून विसर्गात वाढ


नाशिक पाटबंधारे विभागाने (Nashik Irrigation Department) दिलेल्या माहितीनुसार, नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून (Nandur Madhmeshwar Weir) यापूर्वी 39,917 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, सायंकाळी ६ वाजता त्यामध्ये 9,465 क्युसेकने वाढ करून एकूण 49,382 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.


पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात असलेले साहित्य, शेतीसाहित्य किंवा जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत तसेच नदीपात्रात जाणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जलसंपदा विभागाने स्थानिक प्रशासनास आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



गिरणा, मोसम, आरम नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा


दरम्यान, नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गिरणा, मोसम आणि आरम नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे चणकापूर, पुनद, हरणबारी आणि केळझर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने संबंधित धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव पाटबंधारे विभागाने (Malegaon Irrigation Division) नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.



धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू


मालेगाव पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार,


गिरणा नदी पात्रात -


1. चनकापूर धरण विसर्ग - ८,८६४ क्युसेक.


2. पुनंद धरण विसर्ग - १५,०० क्युसेक.


3. ठेंगोडा बंधारा विसर्ग – १५,२०० क्युसेक


मोसम नदी पात्रात -


4. हरणबारी धरण विसर्ग - ११,००० क्युसेक.


आरम नदी पात्रात -


5. केळझर धरण विसर्ग - ३,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.



नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा


तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढील ४ ते ५ तास जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधील विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी नदीपात्रात किंवा पुलांवरून वाहणाऱ्या पाण्यात प्रवेश करू नये, जनावरे व मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे मालेगाव पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

IndiGo Airlines : पर्यटन मंत्रालयाचा इंडिगोसोबत सामंजस्य करार

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने नवी दिल्ली येथे भारताला जागतिक स्तरावरील पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून

Russia-Ukraine War : भारतीय पीडितांच्या कुटुंबीयांना माहिती, मदत आणि न्याय मिळवून देण्याचे निर्देश

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान नोकरीचे आमिष दाखवून रशियात पाठविण्यात आलेल्या आणि नंतर युद्धभूमीवर

Kiren Rijiju : संसद चालवण्यासाठी विरोधकांना सहकार्य करण्याचे किरेन रिजिजू यांचे आवाहन

नवी दिल्ली : विरोधी पक्षांना आवाहन करताना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, त्यांना आपले

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शनिवारी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या एकदिवसीय दौऱ्यावर राहणार आहेत. या

Nipun : स्वदेशी बनावटीची दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका ‘निपुण’ नौदलाकडे सुपूर्द

विशाखापट्टणम : हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने बांधलेली 'निपुण' ही दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका 30 जुलै रोजी

Hyderabad: मेटा इंडियाचे प्रमुखांसह सोशल मीडिया खात्यांविरोधात गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एआय-आधारित आक्षेपार्ह व्हिडिओचे प्रकरण हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी