Google Pixel 11 Series: Pixel 11 सीरिज महागणार? किंमत, बॅटरी आणि स्टोरेजबाबत मोठी माहिती आली समोर

'Made by Google' इव्हेंटपूर्वी Pixel 11, Pixel 11 Pro आणि Pixel 11 Pro XL च्या किंमती आणि फीचर्सची माहिती लीक


मुंबई : पुढील महिन्यात होणाऱ्या 'Made by Google' इव्हेंटमध्ये Google आपल्या बहुप्रतीक्षित Pixel 11 सीरिज लाँच करणार आहे. लाँचपूर्वीच या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजच्या किंमती, स्टोरेज आणि बॅटरीसंबंधी महत्त्वाची माहिती लीक झाली आहे. यंदा Pixel 11 सीरिजमध्ये Pixel 11, Pixel 11 Pro, Pixel 11 Pro XL आणि Pixel 11 Pro Fold असे चार मॉडेल्स सादर होण्याची शक्यता आहे. (Google Pixel 11)



किंमत काय असेल ?


समोर आलेल्या माहितीनुसार, यंदा Google आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत वाढ करू शकते. Pixel 11 ची यूकेमधील सुरुवातीची किंमत 879 GBP (सुमारे 1.12 लाख रुपये) असू शकते. मागील वर्षी Pixel 10 हा 799 GBP मध्ये लाँच झाला होता. मात्र, Pixel 11 यंदा 128GB ऐवजी थेट 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.



त्याचप्रमाणे Pixel 11 Pro ची सुरुवातीची किंमत 1,079 GBP (सुमारे 1.37 लाख रुपये), तर Pixel 11 Pro XL ची किंमत 1,279 GBP (सुमारे 1.65 लाख रुपये) असू शकते. म्हणजेच मागील पिढीच्या तुलनेत प्रत्येक मॉडेलची किंमत सुमारे 10 ते 15 हजार रुपयांनी वाढू शकते.


यंदा Google 128GB स्टोरेज व्हेरिएंट बंद करून सर्व मॉडेल्स 256GB पासून सुरू करणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे किंमत वाढली असली तरी ग्राहकांना अधिक स्टोरेज मिळणार आहे.



बॅटरीमध्ये अपग्रेड होणार नाही का?


बॅटरीबाबतही काही माहिती समोर आली आहे. Pixel 11 मध्ये 4985mAh, Pixel 11 Pro मध्ये 4850mAh आणि Pixel 11 Pro XL मध्ये 5115mAh बॅटरी दिली जाऊ शकते. काही मॉडेल्समध्ये मागील सीरिजच्या तुलनेत बॅटरी क्षमतेत किंचित घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


मात्र, ही सर्व माहिती लीक झालेली असून, Google कडून अधिकृत घोषणा 'Made by Google' इव्हेंटमध्येच होणार आहे. त्यामुळे अंतिम किंमत आणि फीचर्समध्ये काही बदल होऊ शकतात.

Comments
Add Comment

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Nisha Bhagat Fraud Case : प्रसिद्ध मराठी लोकगायिकेविरोधात गुन्हा दाखल; सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप

कल्याण : प्रसिद्ध मराठी लोकगायिका निशा भगत आणि अनिल आहिरे यांच्याविरोधात सरकारी नोकरीच्या आमिषाने २० लाख रुपये

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी