Thursday, July 30, 2026

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा कहर! अमरावती-यवतमाळला रेड अलर्ट; 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा कहर! अमरावती-यवतमाळला रेड अलर्ट; 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

पुढील 24 तास महत्त्वाचे; काही भागांत 200 मिमीपर्यंत पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला असून, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांसाठी विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Vidharbha Rain)

हवामान विभागाने अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Monsoon News)

तसेच अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Rain)

मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाले दुथडी भरून वाहणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून पूरग्रस्त किंवा धोकादायक भागात जाणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. (Weather Alert)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तास विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. (Weather)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >