Nashik Fraud News : परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची तब्बल ३ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रशियन करन्सी अर्थात रुबल एक्सचेंज करून देण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्यांची ही आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित शुभम राकेश सिंग (रा. कमल रो-हाऊस, ज्ञानेश्वर नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) याला पोलिसांनी अटक केली आहे. (Nashik Crime News)
Nashik MHADA Scam : नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा जमीन घोटाळ्यात विशेष तपास पथकाच्या कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले मंडल अधिकारी दिलीप कचरू ...
नेमकं प्रकरण काय ?
फिर्यादी पृथ्वीराज पदमसिंह चांडे आणि संशयित शुभम सिंग हे दोघेही रशियातील 'चेपॉक्सरी युनिव्हर्सिटी'मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी शुभम सिंगने स्वतःला भारतीय चलनाचे रशियन रुबलमध्ये रूपांतर करण्यासाठी विद्यापीठाने अधिकृत केल्याचा दावा केला. यासाठी त्याने बनावट अधिकारपत्रही दाखवले. सुरुवातीला काही लहान व्यवहार यशस्वीपणे करून देत त्याने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकला.(Nashik Crime News)
त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत पृथ्वीराजकडून ७ लाख रुपये, त्याच्या आठ मित्रांकडून ५३ लाख रुपये आणि विद्यापीठातील इतर आठ विद्यार्थ्यांकडून २ कोटी ८८ लाख रुपये अशी एकूण ३ कोटी ४८ लाख रुपयांची रक्कम करन्सी एक्सचेंजच्या नावाखाली स्वीकारली. मात्र, पैसे घेतल्यानंतर ना करन्सी एक्सचेंज करून दिली, ना विद्यार्थ्यांची रक्कम परत केली. (Nashik Crime News)
मुंबई : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवार, ३० जुलै रोजी कसोटी संघाच्या व्यवस्थापनात मोठे बदल केले आहेत. ब्रेंडन मॅक्युलमच्या जागी बोर्डाने ...
परीक्षा संपताच भारतात दाखल
फसवणुकीच्या काळात सर्व विद्यार्थी रशियात शिक्षण घेत असून त्यांच्या परीक्षा सुरू होत्या. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर भारतात परतलेल्या फिर्यादी पृथ्वीराज चांडे यांनी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी २८ जुलै रोजी शुभम राकेश सिंग याला अटक केली असून त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. फुंदे करीत आहेत.





