पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा (Parth Pawar-Kainat Dhar) यांचा साखरपुडा गुरुवारी पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये अत्यंत खासगी, पारंपरिक आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील निवडक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या साखरपुडा समारंभासाठी केवळ मोजक्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब या आनंदसोहळ्याला उपस्थित होते. कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पारंपरिक विधींनुसार साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), दत्ता भरणे, निलेश लंके, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि मान्यवरांनी उपस्थित राहून पार्थ पवार आणि कायनात दारा यांना शुभेच्छा दिल्या. (Parth Pawar-Kainat Dhar)
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुणाला न्याय मिळत नसल्याची भावना असेल, तर संवादातून मार्ग काढू मुंबई : "मराठा समाजाच्या हितासाठी आणि कल्याणासाठी ...
या साखरपुड्याची दिवसभर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. पवार कुटुंबातील या आनंदसोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
कोण आहेत कायनात दारा ?
पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नी कायनात दारा या पंजाबी हिंदू कुटुंबातील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण नवी दिल्लीतील द ब्रिटिश स्कूल, चाणक्यपुरी येथे झाले. त्यानंतर त्यांनी लंडनमधील London School of Economics and Political Science (LSE) येथून आंतरराष्ट्रीय संबंध (International Relations) या विषयात प्रथम श्रेणी सन्मानासह बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. (Parth Pawar-Kainat Dhar)
राज्यातील बंदर विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्राधान्याने मंजुरीची मागणी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल ...
पत्रकारितेपासून उद्योग क्षेत्रापर्यंतचा प्रवास :
कायनात दारा यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम केले आहे. त्यांनी NDTV 24x7 मध्ये रिपोर्टर आणि आउटपुट एडिटर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट व्यवसायात सक्रियपणे कार्यरत आहेत. पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्या साखरपुड्यानंतर आता त्यांच्या विवाहसोहळ्याबाबत उत्सुकता वाढली असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या नव्या नात्याची मोठी चर्चा सुरू आहे. (Parth Pawar-Kainat Dhar)






