Tuesday, July 28, 2026

Sunil Tatkare meets PM Modi : सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Sunil Tatkare meets PM Modi : सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

- सुनील तटकरे यांच्या दिल्ली दौऱ्याने वाढल्या नव्या चर्चांना उधाण

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या सलग भेटींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना आणखी बळ मिळाले आहे. (Sunil Tatkare meets PM Modi)

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील संबंधांबाबत विविध चर्चा सुरू आहेत. दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, की राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) संदर्भात काही नवीन राजकीय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sunil Tatkare meets PM Modi)

या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी संसदेतील कार्यालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही अमित शाह यांच्याशी चर्चा केली. या सलग भेटींनंतर आता सुनील तटकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. (Sunil Tatkare meets PM Modi)

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यामुळे अल्पावधीतच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांच्या दिल्लीतील भेटीगाठींना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. (Sunil Tatkare meets PM Modi)

या भेटींमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, राज्यातील बदलती राजकीय समीकरणे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य भूमिका यासंदर्भात चर्चा झाल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या भेटींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात असल्या तरी कोणत्याही संभाव्य निर्णयाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे दिल्लीतील या उच्चस्तरीय भेटींमागे नेमके राजकीय गणित काय आहे, याकडे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Sunil Tatkare meets PM Modi)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >