मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे २०२५ चे 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना, तर 'स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामांतर "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे करण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहसिक निर्णय ...
तसेच 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार' अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना, तर 'स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार' प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना जाहीर करण्यात आला आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून, सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन आदी विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करून चित्रपटसृष्टीच्या समृद्धीत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.राज्याचे सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






