नवी दिल्ली : यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात पडलेल्या तुटपुंज्या पावसामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना जुलैच्या दमदार पावसाने मोठा दिलासा दिला. जुलै महिन्यातील मुसळधार बरसलेल्या सरींमुळे देशभरातील पावसाची तूट भरून निघत सरासरी ओलांडली गेली आहे. मात्र, आता हवामान विभागाकडून आणि स्कायमेटकडून एक महत्त्वाची अपडेट समोर येत असून, येणारा ऑगस्ट महिना आपल्यासोबत नवीन आव्हाने घेऊन येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मान्सूनमधील खंड (Monsoon Break) आणि प्रशांत महासागरात अधिक तीव्र होत असलेला 'अल निनो' (El Nino) यांचा प्रभाव आगामी काळात पावसाची गणितं बिघडवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई: सध्या सोशल मीडियावरील लाईक्स(likes) आणि व्ह्यूज(views) पाहून रील स्टार्सना थेट मालिकांमध्ये कास्ट करण्याचा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. या बदलत्या ...
उत्तर आणि मध्य भारतात मान्सूनचा तडाखा
सध्या उत्तर आणि मध्य भारतात मान्सूनचा जोर अत्यंत तीव्र झाला असून, आगामी ३ ते ४ दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा (Deep Depression) आता मध्य भारताच्या दिशेने सरकला आहे. त्याच वेळी पश्चिम राजस्थानवरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि उत्तर भारतावर सक्रिय असलेला वेस्टर्न डिस्टर्बन्स यामुळे तिहेरी हवामान प्रणाली तयार झाली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे उत्तर व मध्य भारतात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे.
१ ऑगस्टपासून अंमलबजावणी
ठाणे : पावसाळ्यात धबधबे आणि हिरवाईचा आनंद घेण्यासाठी माळशेज घाटाकडे जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुसळधार ...
डोंगराळ भागांत ढगफुटी आणि भूस्खलनाचा धोका
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. ३१ जुलैपर्यंत जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. धर्मशाला, मंडी, कुल्लू-मनाली, शिमला, हमीरपूर, उना, किन्नौर आणि लाहौल-स्पीती येथे ढगफुटी, भूस्खलन तसेच चिखल साचण्याच्या घटना घडण्याची मोठी शक्यता आहे. याशिवाय डेहराडून, हरिद्वार, ऋषिकेश, नैनीताल आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते.
दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सहारनपूर, मुझफ्फरनगर, मेरठ व अलिगड परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सतत सुरू आहे. मात्र, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरून आता केवळ हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील जळगाव रोड (Jalgaon Road) परिसरात बुधवारी शाळेच्या बसचा (School Bus) थरारक अपघात (Accident) घडला. सुमारे ४० ...
महाराष्ट्र आणि गुजरातची स्थिती कशी?
महाराष्ट्राचा विचार केल्यास, विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली तसेच दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मात्र पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. दुसरीकडे, गुजरातमध्ये किनारपट्टीचा भाग वगळता बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
विशेषतः मराठवाड्यात अद्यापही हवा तसा पाऊस झालेला नाही. विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असताना मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र मात्र कोरडाच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून आणि जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे तूट काही प्रमाणात भरून निघाली असली, तरी मराठवाड्यात अजूनही पाण्याची आणि पिकांच्या वाढीची चिंता कायम आहे.
ठाणे : पावसाळ्यात धबधबे आणि हिरवाईचा आनंद घेण्यासाठी माळशेज घाटाकडे जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुसळधार ...
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस घेणार विश्रांती?
हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून काहीसा थंडावण्याची किंवा गायब होण्याची शक्यता आहे. यामुळे अचानक उकाडा वाढेल आणि हवामान उष्ण व दमट होईल. मराठवाड्यासह अनेक भागांत ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस ब्रेक घेऊ शकतो. त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरिस पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी हजेरी लावू शकतात.
शवविच्छेदन आणि पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक मुंबई : पोलीस कोठडीतील मृत्यूच्या (Custodial Death) प्रत्येक प्रकरणात तपास अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि ...
शवविच्छेदन आणि पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक मुंबई : पोलीस कोठडीतील मृत्यूच्या (Custodial Death) प्रत्येक प्रकरणात तपास अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि ...
शवविच्छेदन आणि पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक मुंबई : पोलीस कोठडीतील मृत्यूच्या (Custodial Death) प्रत्येक प्रकरणात तपास अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि ...






