Wednesday, July 29, 2026

Acting : अभिनयापेक्षा फॉलोअर्स महत्त्वाचे? मालिका विश्वातील बदलत्या ट्रेंडवर ज्येष्ठ अभिनेत्रीने उपस्थित केला प्रश्न

Acting : अभिनयापेक्षा फॉलोअर्स महत्त्वाचे? मालिका विश्वातील बदलत्या ट्रेंडवर ज्येष्ठ अभिनेत्रीने उपस्थित केला प्रश्न

मुंबई: सध्या सोशल मीडियावरील लाईक्स(likes) आणि व्ह्यूज(views) पाहून रील स्टार्सना थेट मालिकांमध्ये कास्ट करण्याचा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. या बदलत्या ट्रेंडवर मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री(Actress) प्राजक्ता दिघे यांनी आपला तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

कलाकारांवर अन्याय : एका मुलाखतीत बोलताना प्राजक्ता दिघे म्हणाल्या, पूर्वीच्या काळात एका प्रोजेक्टमधील अभिनय पाहून दिग्दर्शक(Director) कलाकाराला दुसऱ्या भूमिकेसाठी विचारणा करायचे. आम्हाला कधी काम मागण्यासाठी फोन करावे लागले नाहीत. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता तुमच्या इन्स्टाग्रामचे फॉलोअर्स पाहून तुम्हाला कास्ट केले जाते. केवळ सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत म्हणून रील स्टार्सना काम दिल्यामुळे खऱ्या आणि अनुभवी कलाकारांवर अन्याय होत आहे.

गार्गी फुले यांनीही उपस्थित केला होता प्रश्न:

केवळ प्राजक्ता दिघेच नव्हे, तर याआधी ज्येष्ठ अभिनेत्री गार्गी फुले यांनीही याच मुद्द्यावर भाष्य करत इन्फ्लुएन्सर्सच्या अभिनय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. १०-१० वर्षे मेहनत करून स्वतःला सिद्ध करणाऱ्या कलाकारांची तुलना स्वतःला कंटेंट क्रिएटर्स म्हणवणाऱ्या रील स्टार्सशी होऊ शकत नाही. ते स्टार असतील, पण कलाकार नक्कीच नाहीत, अशा शब्दांत गार्गी फुले यांनी सुनावले होते.

थोडक्यात काय तर, पडद्यावर आणि रंगमंचावर अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे सोपे नाही. मात्र, सध्याच्या डिजिटल युगात अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील लोकप्रियतेला(Popularity) अधिक प्राधान्य दिले जात असल्यामुळे ज्येष्ठ आणि अनुभवी कलाकारांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >