Tuesday, July 28, 2026

Pune Crime : पुण्यात सिनेस्टाईल दरोडा ! कॅशिअरच्या डोळ्यात स्प्रे फवारत ८ लाखांची रोकड लंपास; सिंहगड रस्त्यावर खळबळ

Pune Crime : पुण्यात सिनेस्टाईल दरोडा ! कॅशिअरच्या डोळ्यात स्प्रे फवारत ८ लाखांची रोकड लंपास; सिंहगड रस्त्यावर खळबळ

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात रविवारी रात्री सिनेस्टाईल दरोड्याची धक्कादायक घटना घडली. मद्यविक्री दुकानातील दिवसाची आठ लाख रुपयांची रोकड घेऊन निघालेल्या कॅशिअरला चौघा अज्ञातांनी अडवून त्याच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला. त्यानंतर मारहाण करत रोकड हिसकावून आरोपी दुचाकीवरून फरार झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नऱ्हे पोलिसांनी अज्ञात चौघांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी हौसकुमार प्रकाश इंगळे (वय ४२)यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंगळे हे नऱ्हे येथील एका मद्यविक्री दुकानात कॅशिअर म्हणून कार्यरत आहेत.रविवारी (२६ जुलै) रात्री सुमारे ११ वाजता ते दुकानातील दिवसभराची रोकड घेऊन दुचाकीवरून पिंपरीतील डांगे चौकाच्या दिशेने निघाले होते.

वारजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोहोचताच दोन दुचाकींवरून आलेल्या चौघा चोरट्यांनी त्यांचा रस्ता अडवला.आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारत त्यांना मारहाण केली.काही क्षणांतच रोकड असलेली बॅग हिसकावून आरोपी भरधाव वेगाने पसार झाले.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इंगळे यांना प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार,सहाय्यक पोलिस आयुक्त विजय कुंभार आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून आरोपींच्या हालचालींचा माग काढण्याचे काम सुरू आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण करत असून,आरोपींचा लवकरच शोध लागेल,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >