पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातून मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडील मजुरीसाठी घराबाहेर असताना दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६५ वर्षीय शेजाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. (Pimpri-Chinchwad Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, रमजान बागवान (वय ६५) याने १० आणि ४ वर्षांच्या दोन अल्पवयीन बहिणींना धमकावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना काही दिवसांपासून सुरू असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. (Pimpri-Chinchwad Crime)
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ५०) यांच्या हत्येने संपूर्ण परिसर हादरला आहे. कथित प्रेमसंबंध आणि ...
शेजारी राहणाऱ्या महिलेच्या सतर्कतेमुळे उघड झाला प्रकार :
या गंभीर प्रकाराचा उलगडा शेजारी राहणाऱ्या एका जागरूक महिलेच्या सतर्कतेमुळे झाला. मुलींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने संबंधित महिलेने त्यांच्या आईला याची माहिती दिली. त्यानंतर आईने मुलींशी संवाद साधला असता घडलेला प्रकार समोर आला. त्यानंतर तातडीने वाकड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. (Pimpri-Chinchwad Crime)
आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल :
तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रमजान बागवान याला अटक केली. आरोपीविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri-Chinchwad Crime)
अहमदाबाद : गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना टळली. उमरगाम तालुक्यातील भिलाड रेल्वे स्टेशनजवळ विरारहून भरूचकडे जाणाऱ्या MEMU ...
या प्रकरणाचा तपास वाकड पोलीस करत असून, आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात संतापाची लाट उसळली असून, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Pimpri-Chinchwad Crime)






