Tuesday, July 28, 2026

Uttar Pradesh Viral Video : लॉक अप शोचं 'वेड'! मित्रासोबत भांडण झालं अन् थेट16 व्या मजल्याच्या बाल्कनीबाहेर तरुणी लटकली, व्हिडिओ व्हायरल

Uttar Pradesh Viral Video : लॉक अप शोचं 'वेड'! मित्रासोबत भांडण झालं अन् थेट16 व्या मजल्याच्या बाल्कनीबाहेर तरुणी लटकली, व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामधील अॅमिटी ग्रीन अव्हेन्यू सोसायटीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 16 व्या मजल्यावरील बाल्कनीच्या बाहेरील कठड्यावर एक तरुणी लटकल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत असून, शेजाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे. (Woman hanging from balcony)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 27 जुलै रोजी दुपारी ग्रेटर नोएडा वेस्ट येथील अॅमिटी ग्रीन अव्हेन्यू सोसायटीतील एच टॉवरमध्ये घडली. तरुणी आणि तिच्यासोबत राहणाऱ्या मित्रामध्ये वाद झाला. हा वाद लॉक अप शो वरून सुरु झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की, तरुणी थेट बाल्कनीच्या बाहेरील कठड्यावर उभी राहिली. (Viral video) तरुणी थेट 16 व्या मजल्यावरील बाल्कनीच्या बाहेरील कठड्याला लटकली आहे.

रहिवाशांना मोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर त्यांनी बाहेर पाहिले असता संबंधित तरुणी बाल्कनीच्या बाहेरील बाजूला उभी असल्याचे दिसले. शेजारील इमारतीतील एका व्यक्तीने तिला सतत आत येण्याचे आवाहन केले. काही वेळाने त्याने प्रसंगावधान राखत तिला सुरक्षितपणे आत खेचले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (Lock Upp Show)

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सोसायटीत धाव घेत चौकशी सुरू केली आहे. तरुणी बाल्कनीच्या बाहेर का गेली, यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून महिला सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. (Uttar Pradesh)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >