Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग (जीएसआय) ऑगस्टच्या पूर्वार्धात सर्वेक्षण करणार आहे. यासोबतच त्र्यंबकेश्वर परिसरात भूगर्भीय हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पाच भूकंप निरीक्षण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. (Nashik Simhastha Kumbh Mela)
Nashik : नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव या छोट्याशा गावातून सुरू झालेला सर्वेश कुशारेचा प्रवास आज जगभर गाजत आहे. भुसा भरलेल्या गादीवर उंच उडीचा सराव ...
कुंभमेळ्यासाठी मोठी तयारी
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने संभाव्य आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) अधिक सक्षम करण्यासाठी तयारी सुरू केली असून, १० नैसर्गिक आणि सात मानवनिर्मित अशा एकूण १७ संभाव्य आपत्तींचा अभ्यास केला जात आहे. पावसाळ्यात होणारा नाशिकचा कुंभमेळा हा देशातील इतर कुंभमेळ्यांपेक्षा वेगळा असल्याने अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे आणि भूकंप यांसारख्या संकटांचा विशेष विचार करून नियोजन केले जात आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसात त्र्यंबकेश्वरसह (Trimbakeshwar) परिसरात मोठे नुकसान झाले होते. अनेक पूल पाण्याखाली गेले, काही ठिकाणी दरडी कोसळल्या आणि वाहतूक विस्कळीत झाली. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील नागरिकांचे स्थलांतर करावे लागले होते. त्याच काळात सुरगाणा (Surgana), पेठ (Peth) आणि दिंडोरी (Dindori) तालुक्यांमध्ये सलग तीन दिवस सौम्य भूकंपाचे धक्केही जाणवले होते. (Nashik Simhastha Kumbh Mela)
Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला आता वेग आला आहे. रस्ते, घाट, वाहतूक, विमानतळ, रेल्वे, स्वयंसेवक आणि गर्दी व्यवस्थापन ...
पाच भूकंप निरीक्षण केंद्रे उभारली जाणार
या पार्श्वभूमीवर जीएसआयचे पथक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील अतिधोकादायक ठिकाणांची नव्याने पाहणी करणार आहे. या अभ्यासासाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून जीपीएस लोकेशन (GPS location) आणि छायाचित्रांसह अद्ययावत माहिती जीएसआयला (GSI) उपलब्ध करून दिली जाणार आहे. या अभ्यासाच्या आधारे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह (Kumbh Mela Commissioner Shekhar Singh) यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची मंजुरी; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची लोकसभेत माहिती मुंबई : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ ...
दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भूगर्भीय हालचालींचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी पाच भूकंप निरीक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत. या केंद्रांमधून मिळणाऱ्या वैज्ञानिक माहितीच्या आधारे कुंभमेळ्यापूर्वी सुरक्षित पायाभूत सुविधांचे नियोजन आणि दीर्घकालीन आपत्ती निवारण आराखडा अधिक प्रभावीपणे तयार करता येणार असल्याचेही आयुक्त सिंह यांनी सांगितले. या संदर्भातील बैठकीला जीएसआय राज्य युनिटचे उपमहासंचालक डॉ. बिभास सेन, संचालक मेगो चासी, प्रादेशिक कार्यालयाचे संचालक साबीर पठाण, शास्त्रज्ञ अक्षय जोशी तसेच कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे उपस्थित होते.





