ग्लासगो : कॉमन वेल्थ गेम्स २०२६ ग्लासगो येथे सुरू असलेल्या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण १० पदक जिंकले आहेत. वेटलिफ्टिंग या खेळात भारताने सर्वाधिक सहा पदकं जिंकली आहेत. या क्रीडा स्पर्धेत मणिपूरच्या बिंद्यारानी देवी सोरोखैबाम हिने वेटलिफ्टिंगमधील भारताचा दबदबा कायम राखला आहे. बिंद्यारानीने महिलांच्या ५८ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे. तिने एकूण १९९ किलो वजन उचलले आहे. बिंद्यारानीने सलग दुसर्यांदा कॉमन वेल्थ गेम्समध्ये देशासाठी पदक जिंकले आहे. २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या कॉमन वेल्थ गेम्समध्ये तिने ५५ किलोच्या गटात रौप्य पदक पटकवले होते.
ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकांची लय कायम राखली आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताने ...
कॉमन वेल्थगेम्स २०२६ मध्ये महिलांच्या ५८ किलो वजनी गटात नायजेरियन रिफियातू हिने स्नँचमध्ये १०३ आणि क्लीन अँण्ड जर्कमध्ये १२६ किलो असे एकूण २२९ किलो विक्रमी वजन उचलत सुवर्ण पदक पटकावले आहे. या गटात कॅनडाच्या अॅनसोफीनने २१५ किलो वजन उचलत रौप्य पदकाची कमाई केली आहे.
View this post on Instagram
आतापर्यंत भारताने कॉमन वेल्थ गेम्स २०२६ :
२ सुवर्णपदके,५ रौप्यपदके,३ कांस्यपदके अशी एकूण १० पदके जिंकली असून, भारतीय खेळाडूंची विजयी घोडदौड कायम आहे. भारतीय खेळाडूंच्या या दमदार कामगिरीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या आणखी पदकांच्या आशा वाढल्या असून, आगामी स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडूंकडून उत्कृष्ट प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Commonwealth Games 2026)





