Monday, July 27, 2026

Grant Road Skywalk : ग्रँटरोड नाना चौकातील स्कायवॉकवर पुन्हा सरकत प्रवास

Grant Road Skywalk : ग्रँटरोड नाना चौकातील स्कायवॉकवर पुन्हा सरकत प्रवास

- दोन्ही बंद सरकत्या जिन्यांच्या जागी नव्याने स्थापना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ग्रँटरोडवरील नाना चौकातील स्कायवॉक (Grant Road Skywalk) येथे बसविण्यात आलेले सरकते जिने बंद असून आता नागरिकांच्या मागणीनुसार नव्याने सरकते जिने बसवले जाणार आहेत. याठिकाणी आता दोन्ही जागांवर नव्याने सरकते जिने आणि त्यावर टॉप कव्हरिंग शेडचेही बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे या स्कायवॉकवरील या सरकत्या जिन्यांचे बांधकाम हाती घेवून ते पूर्ण केले जाणार असल्याने नागरिकांसह शाळकरी मुलांना यावरून सहज सरकत प्रवास करता येईल.

नाना चौक, ग्रँट रोड (Grant Road Skywalk) येथे दोन सरकते जिने बसविलेले आहेत आणि हे सरकते जिने ग्रँट रोड रेल्वे स्टेशन (पश्चिम) मुंबईशी जोडलेल्या स्कायवॉकशी जोडलेले आहेत. सद्यस्थितीत दोन्ही सरकते जिने बंद स्थितीत असुन ते दुरुस्तीच्या पलीकडे आहेत. तसेच सरकत्या जिन्यांवरचे कव्हरिंग शेड, कोलेप्सिबल गेट जीर्ण तथा खराब स्थितीत आहेत. तसेच टॉप कव्हरिंग शेडला बसविण्यात आलेल्या कार्बोनेट शीट बदलणे अति आवश्यक आहे. दोन्ही सरकत्या जिन्यांचे हँडरेल बेल्ट, रेलिंग आणि इतर भाग खराब स्थितीत आहेत. या नादुरुस्त सरकत्या जिन्यांबाबत स्थानिक नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत.

दरम्यान, महानगरपालिका आयुक्त यांनी २० मे २०२६ रोजी 'डी' विभागाला दिलेल्या भेटीदरम्यान नाना चौक स्कायवॉक येथे बसविण्यात आलेल्या बंद अवस्थेतील सरकता जिन्याचा सद्यःस्थितीचा आढावा घेतल. हे सरकते जिने लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले. या बंद असलेल्या सरकत्या जिन्यामुळे सर्वसामान्य जनता, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्तींना होणारा त्रास तसेच विविध लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी उपस्थित केलेल्या तक्रारी लक्षात घेता हे सरकते जिने पुनःश्च कार्यान्वित करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले होते. या कार्यालयास कळविले आहे. (Grant Road Skywalk)

त्यानुसार, या स्कायवॉकवर ८.७ मीटर उंचीसाठी १ सरकता जिना आणि ५.७ मीटर उंचीसाठी १ सरकता जिना टॉप कव्हरिंग शेडच्या व्यवस्थेसह काढून त्याठिकाणी नविन सरकत्या जिन्यांचा जागी बसवण्यासाठी निविदा मागवून कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यासाठी मेसर्स कॅलिस्टो ग्लोबल प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली असून एक वर्षांचा हमी कालावधी आणि पुढील दोन वर्षांची देखभाल याकरता तब्बल चार कोटी सोळा लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. (Grant Road Skywalk)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >