Nashik : तब्बल चार वर्षानंतर गंगापूर धरण आणि गोदावरीला सन्मान , महापौर हिमगौरी अडके यांच्या हस्ते गंगापूर धरणाचे जलपूजन

Nashik : एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने राज्यभरात पाठ फिरवली असल्याचं चित्र होतं. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाईचा धोखा लक्षात घेता नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. नाशिक मध्ये दर शनिवारी पाणी कपातीचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. तर ऑगस्टमध्ये दर दिवसाआड पाणी कपात करण्यात येणार होती. मात्र मात्र पावसाने जूनची कसर भरून काढत या महिन्यामध्ये जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाने गोदावरी नदीला दोन मोठे पूर आले. सोबतच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून आजही पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरण साठा पूर्ण जवळपास 95% च्या पुढे गेलाय.



महापौरांच्या हस्ते जलपूजन करण्याची परंपरा


दरम्यान, गंगापूर धरण भरल्यानंतर दरवर्षी महापौरांच्या हस्ते जलपूजन करण्याची परंपरा आहे. मात्र १३ मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्याने गेली चार वर्षे ही परंपरा खंडित झाली होती. आता गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने आज नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त महापौर हिमगौरी आहेर-आडके (Himgauri Adke Aher) यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. सकाळी आठ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला उपमहापौर विलास शिंदे (Deputy Mayor Vilas Shinde), स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप (Standing Committee Chairman Machindra Sanap), आयुक्त मनीषा खत्री (Municpal Commissioner Manisha Khatri), सर्व गटनेते, नगरसेवक तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.



चार वर्षांचा खंड संपला !


शहराचे पहिले महापौर दिवंगत शांताराम बापू वावरे (Shantaram Bapu Vavre) यांच्या काळापासून ही जलपूजनाची परंपरा सुरू झाली . मात्र निवडणूक न झाल्याने महापालिकेत २०२२ पासून चार वर्ष प्रशासकीय राजवट होती. आता चार वर्षांच्या खंडानंतर महापौरांच्या हस्ते जलपूजन झाल्याने परंपरेला पुन्हा सुरुवात झाली असल्याची भावना नाशिककरांकडून व्यक्त केली जातेय.

Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जारी

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,