Monday, July 27, 2026

Nashik Crime News : बडतर्फ केल्याच्या रागातून विद्यार्थ्याचा कॉलेजमध्ये राडा, मर्सिडीजही फोडली

Nashik Crime News : बडतर्फ केल्याच्या रागातून विद्यार्थ्याचा कॉलेजमध्ये राडा, मर्सिडीजही फोडली

Nashik Crime News : महाविद्यालयातून बडतर्फ केल्याचा राग एका विद्यार्थ्याच्या डोक्यात इतका गेला की, त्याने थेट कॉलेजमध्ये घुसून राडा घातला आहे. सुरक्षा केबिन, रिसेप्शन आणि संचालकांच्या महागड्या मर्सडीज कारची तोडफोड करत तब्बल तीन लाख रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे.

घटना काय घडली ?

गंगापूर परिसरातील मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये हा संपूर्ण थरार उघडकीस आला आहे. प्रणव धर्मदास वाघ (वय २५, रा. अवधान, ता. जि. धुळे) या विद्यार्थ्याला शिस्तभंगाच्या कारवाईतून महाविद्यालयातून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, त्याचा राग मनात धरून त्याने रात्री कॉलेजमध्ये प्रवेश केला. प्रथम प्रवेशद्वारावरील फलकावर दगडफेक केली. त्यानंतर लोखंडी रॉडने सुरक्षा केबिन, रिसेप्शन आणि डॉक्टरांच्या कक्षाच्या काचा फोडल्या. (Nashik Crime News)

बडतर्फ केल्याच्या रागातून कॉलेजमध्ये राडा

गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास संशयित प्रणव वाघ याने कॉलेजमध्ये येण्यास बंदी असतानाही मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या (Motiwala Homoeopathic Medical College) आवारात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. कॉलेजमधून बडतर्फ केल्याचा राग मनात धरून त्याने प्रवेशद्वारावरील फलकावर दगड फेकून मारले. त्यानंतर परिसरात पडलेला एक लोखंडी रॉड उचलून सुरक्षा केबिन, रिसेप्शनच्या पाठीमागील खिडकी आणि डॉक्टर रूमच्या दरवाजाच्या काचांवर जोरदार प्रहार करत तोडफोड केली. (Nashik Crime News)

तर कॉलेज प्रशासनाच्या नावाने आत्महत्या करेन

गोंधळ सुरू असताना कॉलेजचे संचालक डॉ. फराज मोतीवाला (Dr. Faraz Motiwala) यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्याने त्यांनाही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, आवारात उभी असलेल्या त्यांच्या मर्सडीज कारवर रॉडने हल्ला करून कारची डिक्की आणि काचा फोडल्या. तोडफोडीनंतर विद्यार्थ्याने स्वतःचा हात काचेवर मारून जखमी केला आणि 'कॉलेज प्रशासनाच्या नावाने आत्महत्या करेन' अशी धमकी दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. (Nashik Crime News)

डॉ. फराज मोतीवाला यांच्या फिर्यादीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) गुन्हा नोंदवला असून संशयितास नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >