Monday, July 27, 2026

Indian Idol 16 : ज्योतिर्मयी नायक ठरली इंडियन आयडल 16 ची विजेती!

Indian Idol 16 : ज्योतिर्मयी नायक ठरली इंडियन आयडल 16 ची विजेती!

मुंबई : लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो (Reality Show) 'इंडियन आयडल १६' (Indian Idol 16) ला अखेर विजेती (Winner) मिळाली आहे. तब्बल १० महिन्यांच्या प्रवासानंतर ज्योतिर्मयी नायक हिने 'इंडियन आयडल १६' ची ट्रॉफी (Trophy) जिंकत विजेतेपदावर (Title) नाव कोरलं. अंतिम फेरीत (Grand Finale) तिची तनिष्क शुक्लासोबत चुरशीची लढत पाहायला मिळाली.

ज्योतिर्मयी नायक हिला विजेतेपदासोबत ट्रॉफी (Trophy), नवी कोरी कार (Car) आणि २० लाख रुपयांचं रोख बक्षीस (Prize Money) प्रदान करण्यात आलं. तर तनिष्क शुक्ला उपविजेता (Runner-up) ठरला. मनराज वीर सिंह याने तिसरे स्थान (Second Runner-up) मिळवत ५ लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं.

यंदाच्या 'इंडियन आयडल १६' च्या टॉप ६ (Top 6) स्पर्धकांमध्ये (Contestants) ज्योतिर्मयी नायक, तनिष्क शुक्ला, मनराज वीर सिंग, सोहेल सूफी, अंशिका चोणकर आणि मिस्मी बोसु यांचा समावेश होता. मात्र स्पॉटलाइट राऊंडनंतर (Spotlight Round) मिस्मी बोसु स्पर्धेबाहेर गेली, तर अंशिका चोणकर आणि सोहेल सूफी यांना कमी मतांमुळे (Votes) टॉप ३ मध्ये स्थान मिळवता आलं नाही. या दोघांनाही सोनी टेलिव्हिजनने (Sony Television) प्रत्येकी ३ लाख रुपयांचं बक्षीस दिलं.

विजेतेपद जिंकल्यानंतर ज्योतिर्मयी नायकने सोशल मीडिया (Social Media) वर ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या. "एक वर्ष, असंख्य त्याग, सातत्याने रिहर्सल (Rehearsal) आणि अथक मेहनतीनंतर आज ही ट्रॉफी हातात आहे. हा विजय केवळ माझा नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे," असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. यावेळी तिने कुटुंबीय, चाहते (Fans), परीक्षक (Judges) आणि गुरूंचेही आभार मानले.

यंदाच्या पर्वात (Season) विशाल ददलानी, बादशाह आणि श्रेया घोषाल यांनी परीक्षक (Judges) म्हणून जबाबदारी सांभाळली. मात्र पूर्वनियोजित कामामुळे विशाल ददलानी ग्रँड फिनालेला (Grand Finale) उपस्थित राहू शकले नाहीत. दोन दिवस चाललेल्या ग्रँड फिनालेमध्ये (Grand Finale) अनेक दिग्गज कलाकारांनी विशेष सादरीकरणे (Performances) केली.

आदित्य नारायणने या सीझनचे सूत्रसंचालन (Hosting) केले. अंतिम सोहळ्यात (Grand Finale) उषा उत्थुप, उदित नारायण, पापोन, कुमार सानू, शहनाज गिल आणि उर्मिला मातोंडकर यांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची रंगत वाढवली. श्रेया घोषाल आणि पापोन यांच्या सादरीकरणालाही (Performance) प्रेक्षकांची मोठी दाद मिळाली. उर्मिला मातोंडकरने 'रंगीला'सह आपल्या लोकप्रिय गाण्यांवर दमदार परफॉर्मन्स (Performance) सादर केला. यंदाचा 'इंडियन आयडल १६' (Indian Idol 16) हा मागील पर्वांच्या तुलनेत सर्वाधिक काळ चाललेला सीझन (Season) ठरला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >