हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे खेळवला जात आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने पहिला टी-२० सामना जिंकत या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. (Ind VS Zim)
नवी दिल्ली: देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा ...
झिम्बाब्वेच्या ब्लेसिंह मुझारबानीने भारताला पहिला झटका दिला आहे. त्याने दुसर्या षटकात अभिषेक शर्माला बाद करत भारताला पहिला झटका दिला आहे. अभिषेकने ८ चेंडूंम्ध्ये फक्त आठ धावा केल्या आहेत. त्यानंतर वैभवही नऊ चेंडूंमध्ये २० धावा करत बाद झाला आहे. झिम्बाब्वेच्या रिचर्ड नगारावने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर वैभवला बाद करत भारताच्या अडचणीत भर टाकली आहे.भारताने या सामन्यासाठी आपल्या संघात एक मोठा बदल केला आहे. यश ठाकूरला पदर्पणाची संधी देण्यात आली आहे. तर अशोक शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. आता, दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत अभेद्य आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करेल. भारताने आतापर्यंत ५.२ षटकात दोन बाद ४७ धावा केल्या आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरसह ईशान किशनने झिम्बाब्वेच्या गोलंदाजीवर फटकेबाजी सुरू केली आहे. (Vaibhav Sooryvanshi)
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) विश्वात जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 'ChatGPT' या लोकप्रिय AI चॅटबॉटची सेवा शनिवारी अचानक विस्कळीत झाल्यामुळे खळबळ उडाली ...
टी-२० मालिकेसाठी भारत आणि झिम्बाब्वेचे संघ
भारतीय संघ : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव, सुर्यांश शेडगे, हर्ष दुबे, प्रभास सिंह, प्रभाकर सिंह.
झिम्बाब्वे संघ: ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमनी (विकेटकीपर), बेन कुरन, डिओन मायर्स, सिकंदर रझा (क), रायन बर्ल, वेस्ली माधेवेरे, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्यामुरी, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तफादझ्वा त्सिगा, तफादझ्वा त्सिगा, वेलेंटाका, इनोसेंट्का.






