जपानमध्ये घुमणार 'कबड्डी-कबड्डी'

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली असून भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही कबड्डी संघांचा 'अ' गटात समावेश करण्यात आला आहे.आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जपानच्या आयची प्रांतात होणार आहेत. कबड्डीच्या स्पर्धा २१ ते २६ सप्टेंबरदरम्यान तोकाई सिटिझन्स जिम्नॅशियम येथे रंगणार आहेत. पुरुष गटात एकूण १० संघ सहभागी होणार असून त्यांना प्रत्येकी पाच संघांच्या दोन गटांत विभागण्यात आले आहे. भारताचा समावेश असलेल्या 'अ' गटात बांगलादेश, दक्षिण कोरिया, चिनी तैपेई आणि यजमान जपान यांचा समावेश आहे.



पुरुष कबड्डी गटवारी :


'अ' गट: भारत, बांगलादेश, दक्षिण कोरिया, चिनी तैपेई, जपान
'ब' गट : नेपाळ, थायलंड, पाकिस्तान, मलेशिया, इराण



महिला कबड्डी गटवारी :


'अ' गट भारत, इराण, जपान, बांगलादेश
'ब' गट : श्रीलंका, थायलंड, चिनी तैपेई, नेपाळ

Comments
Add Comment

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

IND vs SL Galle Test : भारतापाठोपाठ श्रीलंकाही पहिल्या डावात 'ऑलआऊट', जाणून घ्या गॉल कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे किती धावांची आघाडी ?

गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय

Ind vs SL Test Match : श्रीलंकेवर फॉलोऑनची टांगती तलवार : लंकेच्या ४६२ धावांत ५ गडी बाद; टीम इंडियाच्या विजयात पावसाचा अडथळा?

Ind vs SL Test Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या निवृत्तीचे संकेत; २०२६-२७ हंगाम ठरू शकतो अखेरचा!

मुंबई : फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) लवकरच आपल्या २५ वर्षांच्या

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान