Saturday, October 10, 2026

FDA : महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनवर एफडीएची धाड

तत्काळ सेवा बंद करण्याचे दिले निर्देश

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये (Canteen) ताकाच्या ग्लासात माशी आढळल्याचे निदर्शनास आल्यानंतर बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कॅन्टीनवर धाड (Raid) टाकून सखोल तपासणी केली. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सुमारे पाच तास संपूर्ण कॅन्टीनची पाहणी व तपासणी केली. त्यानंतर या उपहार गृहाची सेवा तत्काळ बंद करण्याची नोटीस जारी केली आहे. त्यामुळे के इ एम रुग्णालय (KEM Hospital) पाठोपाठ आता महापालिका मुख्यालय येथील कॅन्टीनही एफडीएच्या या कारवाईमुळे बंद ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने २५ हजार रुपये आणि कामगार (Labour) विभागाने २५ हजार रुपये, असे एकूण ५० हजार रुपयांचा दंड संबंधित कॅन्टीन चालकावर ठोठावला असल्याची माहिती मिळत आहे.

केईएम रुग्णालयातील कॅन्टीननंतर आता मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनवरही एफडीएची धाड पडली आहे. महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन चालविण्याचा ठेका कमल कॅटरर्स या संस्थेला देण्यात आला आहे. यावेळी एफ डी ए च्या अधिकाऱ्यांनी सर्व खाद्य वस्तू. येथील पॅकेट मधील दुध तसेच इतर पदार्थ आदींची तपासणी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >