Thursday, July 23, 2026

Student Protest : भाजपचे निशिकांत दुबे यांची पोस्ट व्हायरल; जंतर-मंतर आंदोलनावरून राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यावर टीका

Student Protest : भाजपचे निशिकांत दुबे यांची पोस्ट व्हायरल; जंतर-मंतर आंदोलनावरून राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यावर टीका

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर खासदार (BJP) निशिकांत दुबे यांची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर उपरोधिक टिप्पणी करण्यात आली आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हायरल पोस्टमध्ये जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना "संविधानाचे सिपाही" असे संबोधण्यात आले आहे. तसेच त्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला राहुल गांधी, अखिलेश यादव आणि विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. "राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी आंदोलन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची नावे आणि पत्ते लिहून घेतले असून, ते सत्तेत आल्यानंतर सर्वांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल का?" असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून काही जण त्याला राजकीय टोला मानत आहेत, तर काहींनी या पोस्टवर टीका केली आहे. दरम्यान, या पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्याबाबत राहुल गांधी, अखिलेश यादव किंवा संबंधित पक्षांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

राजकारण तापले 

जंतर-मंतर येथे गेले अनेक दिवस आंदोल सुरु होते. या आंदोलनाने मागील दोनदिवसांपासून रौद्र रूप धारण केले आहे. याचे पडसाद अनेक राज्यात दिसून येत आहे.  या दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून दिल्लीत चांगलेच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा