पुनर्विकास आराखड्यासह चित्रपट धोरणाचा मसुदा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना सादर
मुंबई(Mumbai) : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा (film city) सर्वांगीण पुनर्विकास आणि महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे चित्रपट निर्मिती केंद्र बनवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. चित्रनगरीच्या प्राथमिक पुनर्विकासाचा आराखडा आणि राज्याच्या नवीन चित्रपट धोरणाचा मसुदा चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी बुधवारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे सादर केला. या नव्या आराखड्यामुळे रखडलेल्या पुनर्विकासाला गती मिळून चित्रनगरीच्या कायापालटाचा मार्ग सुकर झाला आहे.(Goregaon)
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वाढदिवशी सर्व सोहळे टाळत पायी वारीमध्ये सहभागी मुंबई : "विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करणे हे ...
मंत्रालयात आयोजित या विशेष बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, उपसचिव महेश वाव्हळ, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार चित्रलेखा खातू आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यामध्ये चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी आणि डिजिटल कंटेंट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी या पुनर्विकास आराखड्यात अत्याधुनिक स्टुडिओ संकुल, पोस्ट-प्रॉडक्शन सुविधा, व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्टुडिओ, आधुनिक साउंड स्टेजेस, फिल्म टेक्नॉलॉजी सेंटर आणि पर्यटनाभिमुख सुविधांची आखणी करण्यात आली आहे.
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, वारकरी संप्रदायाचे प्राण आणि भक्तांचे पाठीराखे असलेल्या भगवान श्रीविठ्ठलाचे नाव घेताच डोळ्यांसमोर उभी राहते ती ...






