Shubham Gill : कुलदीपला का डावलण्यात आलं? शुभमन गिलने दिली मोठी माहिती; निर्णय योगय होता की नाही ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत, इंग्लंडने २-१ ने भारतावर विजय मिळवला. या तिन्ही सामन्यांमध्ये कुलदीपला संधी देण्यात आली नव्हती. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे संघातून बाहेर झाला होता. त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, या त्याला एकही सामन्यात संधी देण्यात आली नाही. यामुळे प्रशिक्षक गंभीर आणि व्यावस्थापनेवर जोरदार टीका केली जात आहे. (Ind vs Eng)



कुलदीप यादवला इंग्लंड दौऱ्यात एकही सामन्यात संधी देण्यात आली नाही. त्याला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपासूनही वगळण्यात आले होते. यावर भारतीय कर्णधार शुभमन गिलने कुलदिप संधी का देण्यात आली नाही यावर स्पष्टीकरण दिले आहे. (Shubham Gill)



कुलदीपला संधी का देण्यात आली नाही ?


लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या सामन्यानंतर प्रेझेंटेशनमध्ये शुभमन गिलने कुलदीप यादवला संधी का देण्यात आली नाही यावर स्पष्टीकरण दिले. गिल म्हणाला, "आम्ही आधीच्या सामन्यांमध्ये पाहिले होते की खेळपट्टया फिरकीपटूंना फारशी मदत करत नव्हत्या. जेव्हा जेव्हा फिरकीपटू गोलंदाजीसाठी येत, तेव्हा आम्हाला बचावात्मक क्षेत्ररक्षण लावावे लागत असे. याउलट, वेगवान गोलंदाज प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरत होते. म्हणूनच आम्ही अतिरिक्त फिरकीपटूला संधी दिली नाही." (Gautam Ghambhir)



तिसऱ्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांना रोखता आले नाही.इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांची धुलाई करत ५० षटकात ३८७ धावा केल्या. या संपूर्ण मालिकेत भारतीय गोलंदाजांना मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेता आले नाही. शुभमन गिलने मान्य केले की सामन्याच्या सुरुवातीला जी खेळपट्टी होती, सामना जसाजसा पुढे सरकला ती खेळपट्टी आणखी स्लो होत गेली. जेव्हा गोलंदाजीला अक्षेर पटेल गोलंदाजीला आला, तेव्हा खेळपट्टी इतकी स्लो होईल याचा आम्हाला अंदाजा नव्हता. मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि वरुण आरोन (Varun Aaron) यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी आणि विश्लेषकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा