Saturday, July 18, 2026

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग, म्युरल्स उभारण्याच्या डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सूचना

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग, म्युरल्स उभारण्याच्या डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सूचना

Nashik Simhastha Kumbh Mela :गामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व परिसरातील विविध नदीघाटांवर सुरू असलेल्या कामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Pravin Gedam) यांनी पाहणी केली. घाट परिसराचे सौंदर्यीकरण करताना भारतीय स्थापत्यकलेचा नमुना असलेली म्युरल्स उभारावीत तसेच वृक्षारोपणाचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. कामांची गुणवत्ता आणि दर्जा कायम ठेवण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Nashik Simhastha Kumbh Mela)

आकर्षक म्युरल्स उभारण्याची सूचना

जलसंपदा विभागांतर्गत सुरू असलेल्या कपिला घाट, नंदिनी घाट, दसक घाट, ओढा घाट तसेच तपोवनपर्यंतच्या घाटकामांचा डॉ. गेडाम यांनी आढावा घेतला. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन ये-जा मार्ग, निर्गमन व्यवस्था आणि आवश्यक सुविधांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. घाट परिसर भाविकांना सुंदर आणि प्रसन्न अनुभव देणारा असावा, यासाठी घाटाच्या दोन्ही बाजूंना आकर्षक म्युरल्स उभारण्याची सूचना त्यांनी केली. कामे वेळेत पूर्ण करताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Nashik Simhastha Kumbh Mela)

गुणवत्तापूर्ण कामांवर भर

नांदूर-दसक घाटाप्रमाणेच इतर घाटांवरही वृक्षारोपणाचे नियोजन करावे. भाविकांना चालताना त्रास होणार नाही, अशा दर्जेदार फरशी व साहित्याचा वापर करावा. बांधकाम साहित्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देश डॉ. गेडाम यांनी दिले. यापूर्वी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली आहे का, याची पाहणी करून आवश्यक बदल व सुविधा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. (Nashik Simhastha Kumbh Mela)

यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धन, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority) गुणनियंत्रण सल्लागार तथा सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता किशोर पाटील, सहायक संशोधन अधिकारी योगेश सोमवंशी, सल्लागार अजिंक्य इनामदार, टीयूव्ही सूद साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेडचे सुरेंद्र प्रताप कट्टा, राहुल पोरे, तसेच जलसंपदा विभागाचे उपअभियंता प्रवीण पवार, समीर साळवे, योगेश्वर विंचू, तुषार खैरनार, नारायण डावरे आदी उपस्थित होते.

कुंभमेळ्याच्या दिमतीला ४ हजार ३०० कुशल तरुण

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी आणि सोयी-सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्यासाठी तब्बल ४ हजार उमेदवारांना पूर्वकौशल्य ज्ञान आणि ३०० उमेदवारांच्या अल्पमुदतीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मुंबईत आयोजित विशेष सोहळ्यात या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली. या योजनेमुळे हॉस्पिटॅलिटी, रिटेल, ऑटोमोबाईल, बांधकाम, आरोग्य सेवा आणि पर्यटन अशा प्रमुख क्षेत्रांसाठी प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळाची मोठी फळी कुंभमेळ्यासाठी सज्ज होणार आह

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा