भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत अनेक भाविक जखमी झाले असून एका भाविकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत बैठक मुंबई : शालेय जीवनापासूनच अंमली ...
ही घटना बडा दांडा (ग्रँड रोड) परिसरात घडली, जिथे भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथांचे दर्शन आणि रथ ओढण्याचा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जमले होते.घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. आपत्कालीन पथकांनी जखमींना सुरक्षितस्थळी हलवून जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत व बचावकार्य हाती घेत गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले, ज्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात मदत झाली.
View this post on Instagram
टोकियो : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने या मोसमातील सर्वोत्तम कामगिरींपैकी एक करत, चीनच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर ...
ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी या घटनेतील मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.जगन्नाथ रथयात्रा हा भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक मानला जातो. या सोहळ्यात दरवर्षी देश-विदेशातील लाखो भाविक सहभागी होतात. दरम्यान, चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रशासन परिस्थितीचा आढावा घेत असून आहे.






