BMC News : कोविड काळातील ऑक्सिजन प्लांटची यंत्रणा गेली कुठे? , स्थायी समिती सदस्यांचा प्रशासनाचा सवाल

माहिती सादर करण्याचे अध्यक्षांचे निर्देश


मुंबई : कोविड काळामध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते. मात्र कोविड संपल्यानंतर या ऑक्सिजन प्लांटच्या यंत्रणा काढून टाकण्यात आल्या. मात्र या काढून टाकण्यात आलेल्या यंत्रणा कुठे ठेवण्यात आल्या? त्यांची आजची स्थिती काय ? आणि भविष्यात याची गरज निर्माण झाली तर महापालिका प्रशासन काय करणार आहे याबाबतची विचारणा करत ,याचा अहवाल स्थायी समिती पुढे ठेवण्यात यावा अशी मागणी स्थायी समितीत सदस्यांनी केली. या यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी याचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.


मुंबई महापालिकेच्या केइएम रुग्णालयातील ३९ वेला व्हेंटिव्हेटर यांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता भाजपचे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी हे ३९ पैकी किती व्हेंटिव्हेटर बंद पडत असतात. या ३९पैकी किती व्हेंटिव्हेटर कार्यान्वित आहेत. तसेच किती व्हेंटिलेटरची अजून गरज आहे... कितीचा तुटवडा आहे याची माहिती विचारली आहे. आता मागील कालावधीच्या कामासाठी चा पैसे देण्यासाठीचा प्रस्ताव असून पुढील कालावधीच्या देखभालीचे कंत्राट दिले जाणार आहे का? मग पुढील देखभालीचे कंत्राट दिले जाणार आहे का की एम आर आय प्रमाणे हे व्हेंटिलेटर बंद पडून महापालिकेची बदनामी झाल्यानंतर याचे पुढील कंत्राट दिले जाणार आहे,याबाबत स्पष्टता यायला हवी. अशी मागणी केली.



यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सईदा खान यांनी के इ एम रुग्णालयात किती आयसीयू बेड आहेत.३९ व्हेंटिलेटर हे कोणकोणत्या प्रकारचे आहेत अशी विचारणा करत आयसीयू मध्ये ५० टक्के व्हेंटिलेटर आणि पन्नास टक्के आयसीयू बेड्स ठेवण्यात यावे जेणेकरून रुग्णांची काळजी योग्य प्रकारे घेतली जाईल अशी सूचना केली केली. तर सभागृह नेते गणेश खणकर यांनी कोविड काळामध्ये रुग्णांची ऑक्सिजन अभावी मोठी गैरसोयी झाल्यानंतर महापालिकेच्यावतीने जे ऑक्सिजन प्लांट उभारले होते ,त्याची आजची स्थिती काय आहे, असे विचारणा केली. हे ऑक्सिजन प्लांट रुग्णांना जीवनदान देण्यासाठी, आरोग्य व्यवस्था बळकटी देण्यासाठी बनवले होते. परंतु कोविडचा आजार संपुष्टात आल्यानंतर हे ऑक्सिजन प्लांट बंद करण्यात आले आहेत. मात्र बंद करण्यात आलेली ही ऑक्सिजन प्लांटची यंत्रणा नक्की आज कुठे आहे? कुठे नेऊन ठेवली ? आहे याची माहिती समोर यायला पाहिजे. कारण यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. एवढा पैसा खर्च केल्यानंतर आज महापालिकेच्या रुग्णालयांना याचा उपयोग होणार नसेल तर ते योग्य नाही, असे सांगत नाराजी व्यक्त केली. तसेच याची माहिती देण्याची मागणी ही त्यांनी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी कोविड काळातील ऑक्सिजन प्लांटची आजची स्थिती काय आहे. याची माहिती समितीला सादर करावी असे निर्देश प्रशासनाला दिले आहे. यावेळी झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेत डॉक्टर अजंता यादव, श्रद्धा जाधव, शीतल गंभीर,मीनाक्षी पाटणकर आदींनी चर्चेत भाग घेतला होता.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा