नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या स्वरूपात मोठे बदल निश्चित केले आहेत. एडिनबर्ग येथे झालेल्या आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGS) आयसीसीने २०२७ च्या पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुधारित स्वरूपाला मंजुरी दिली. अधिक रोमांचक सामने घडवणे, स्पर्धेचा स्तर उंचावणे, दोन्ही स्पर्धांची स्पर्धात्मक रचना अधिक मजबूत करणे आणि क्रिकेटपटू आणि चाहत्यांसाठी स्पर्धेचा अनुभव सुधारणे, या उद्देशाने आयसीसीने स्वरूपात हे महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या स्पर्धेत १४ संघ सहभागी होतील, पण मुख्य स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक अतिरिक्त पात्रता फेरी असेल. सर्वात कमी मानांकन असलेले तीन संघ सुपर सिरीज खेळतील, ज्यामधून केवळ एक संघ मुख्य स्पर्धेत प्रवेश करेल आणि दोन संघ बाद होतील.(ICC Cricket)
नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. या पार्श्वभूमीवर, अनुभवी फलंदाज ...
पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाईल. यामध्ये १४ संघ सहभागी होतील आणि अंतिम फेरी गाठण्यासाठी एका नवीन तीन-टप्प्यांच्या स्वरूपाचा अवलंब केला जाईल. गट फेरीच्या आधी सुपर सिरीज फेरी होईल, ज्यामध्ये दोन संघ बाद केले जातील. यानंतर १२ संघ उरतील, जे प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागले जातील आणि पुढील फेरीत प्रवेश करतील.
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात झाली. याअंतर्गत एअर इंडिया एक्सप्रेसने विमानतळावरून अबू ...
वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर बुधवारी नवीन रचनेची घोषणा करण्यात आली. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यांचे महत्त्व आणि तीव्रता वाढवण्यासाठी ही रचना सादर करण्यात आल्याचे नियामक मंडळाने सांगितले. या स्वरूपानुसार, गट फेऱ्यांनंतर 'सुपर सेव्हन' टप्पा होईल, ज्यामध्ये प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ आणि दोन्ही गटांमधील पुढील सर्वोच्च मानांकित संघ सहभागी होतील. या फेरीत सात संघ राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळतील आणि त्यातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. दुसऱ्या उपांत्य फेरीत, प्रथम क्रमांकावरील संघ चौथ्या क्रमांकावरील संघाशी, तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकावरील संघ एकमेकांशी भिडतील.
२०२७ चा विश्वचषक दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे या तीन देशांमध्ये खेळला जाईल. हा विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळला जाईल. आयसीसीने विश्वचषकासाठी हे स्वरूप पहिल्यांदाच सादर केले आहे.





