Organ Donation Awareness : अवयवदानाचा संकल्प करत आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी साजरा केला वाढदिवस

अवयव दान चळवळीचे नेतृत्व करणार भांदिर्गे


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई: वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, केक आणि आनंदाचा उत्सव येतोच, मात्र मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी या सगळ्याला बगल देत अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला आहे. भांदिर्गे यांनी मुंबईतील बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयात अवयवदानासाठी अधिकृत नोंदणी करून मृत्यूनंतरही इतरांना जीवन देण्याचा संकल्प करत एकप्रकारे अवयव दानासाठी पुढाकार घेतला. तसेच या अवयव दानाच्या चळवळीची आपल्यापासून सुरुवात केली.



या उपक्रमामुळे नायर रुग्णालयाच्या इतिहासात एक महत्त्वाची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्ष या नात्याने अवयवदानासाठी अधिकृत अर्ज करणारे हरिष भांदिर्गे हे पहिले व्यक्ती ठरले आहेत.
"वाढदिवस हा केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाला काहीतरी देण्याची संधी आहे. माझ्यानंतर माझ्या अवयवांमुळे एखाद्याला नवजीवन मिळणार असेल, तर त्यापेक्षा मोठे भाग्य आणि समाधान दुसरे असू शकत नाही.,असे भांदिर्गे यांनी स्पष्ट



आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणून अवयवदानाबाबत समाजात जनजागृती करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. आज देशभरात हजारो रुग्ण हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे आणि इतर अवयवांच्या प्रतीक्षेत जीवन-मरणाशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत एका व्यक्तीचे अवयवदान अनेकांना नवजीवन देऊ शकते, हीच खरी मानवसेवा असल्याचा संदेश त्यांनी दिला.


"मृत्यूनंतर शरीर संपते, पण आपल्या अवयवांमधून अनेकांचे आयुष्य पुन्हा फुलू शकते. आपण या जगातून निघून गेल्यानंतरही आपल्या अस्तित्वाचा एक भाग कोणाच्या तरी श्वासात, हृदयाच्या ठोक्यात किंवा डोळ्यांतील प्रकाशात जिवंत राहू शकतो. यापेक्षा मोठे दान आणि मानवतेची सेवा कोणती?" असे भावनिक उद्गारही त्यांनी व्यक्त केले.


समाजातील प्रत्येक नागरिकाने अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करून या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. वाढदिवसानिमित्त केलेला हा संकल्प केवळ वैयक्तिक निर्णय नसून समाजात अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी नायर रुग्णालयाचे डीन डॉ. शैलेंद्र मोहिते यांच्यासह नायर रुग्णालयातील सर्व प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स आणि सहकारी वर्ग उपस्थित होता.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा