IND vs ENG ODI : इंग्लंडचा मोठा डाव! सलामीची जोडी पुन्हा बदलली; भारताविरुद्ध तीन फिरकीपटूंवर मोठा विश्वास

मुंबई : भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या अंतिम ११ खेळाडूंची घोषणा केली आहे. एडजबॅस्टन येथे होणाऱ्या या सामन्यात इंग्लंडने पुन्हा एकदा सलामीच्या जोडीत बदल करत जेकब बेथेल आणि बेन डकेट यांच्यावर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी सोपवली आहे. तसेच भारताच्या मजबूत फलंदाजीला रोखण्यासाठी इंग्लंडने तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. (IND vs ENG ODI)


टी-२० मालिकेत भारताचा ४-० असा धुव्वा उडवल्यानंतर आता इंग्लंडचे लक्ष्य एकदिवसीय मालिकाही खिशात घालण्याचे आहे. त्यामुळे संघ निवडीत त्यांनी आक्रमक आणि संतुलित संयोजनावर भर दिला आहे. (IND vs ENG ODI)



बेथेलला सलामीची संधी, डकेटचा पाचवा जोडीदार :


इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जेकब बेथेलला सलामीला बढती दिली आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात बेन डकेटचा हा पाचवा सलामीचा जोडीदार ठरणार आहे. यापूर्वी फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, झॅक क्रॉली आणि रेहान अहमद यांनी ही भूमिका पार पाडली होती. डकेटसाठी स्थिर सलामीवीर शोधण्याचा इंग्लंडचा प्रयत्न यामधून स्पष्ट दिसतो. (IND vs ENG ODI)



भारतासाठी फिरकीचे जाळे :


भारताच्या दमदार फलंदाजीला रोखण्यासाठी इंग्लंडने विल जॅक्स, लियाम डॉसन आणि आदिल रशीद या तीन फिरकीपटूंना संधी दिली आहे. वेगवान गोलंदाजांच्या फळीत जोफ्रा आर्चरचे पुनरागमन झाले असून तो जोश टंगसोबत नवी चेंडूची जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र, गस अॅटकिन्सनला अंतिम संघात स्थान मिळालेले नाही. (IND vs ENG ODI)



बटलरसाठी खास सामना :


या सामन्याला इंग्लंडचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरसाठी विशेष महत्त्व आहे. भारताविरुद्धचा हा सामना त्याच्या कारकिर्दीतील २००वा एकदिवसीय सामना ठरणार आहे. २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलेल्या बटलरने आतापर्यंत १९९ सामन्यांत ५,५१५ धावा करत ११ शतके आणि २९ अर्धशतके झळकावली आहेत. (IND vs ENG ODI)


पहिल्या सामन्यानंतर मालिकेतील उर्वरित सामने १६ जुलै रोजी कार्डिफ आणि १९ जुलै रोजी लॉर्ड्स येथे खेळवले जाणार आहेत.



भारताविरुद्ध पहिल्या वनडेसाठी इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन :


जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, जोश टंग, आदिल रशीद

Comments
Add Comment

Arshdeep Singh : ‘सॉरी एश भाई...’; टॉप-5 गोलंदाजांची यादी सांगताना अर्शदीपने अश्विनची मागितली माफी, कारण ऐकून चाहत्यांनाही हसू आवरेना!

नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आपल्या दमदार गोलंदाजीसह बिनधास्त

Glasgow Commonwealth Games 2026 : पाकिस्तानी बॉक्सर कुदरतुल्ला हॉटेलमधून बेपत्ता; पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशन पुन्हा वादात

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ च्या अखेरीस ग्लासगोमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा बॉक्सर

Akhilesh Reddy : मॅच फिक्सिंग प्रकरणात अमेरिकन क्रिकेटपटूला ICCचा दणका! अखिलेश रेड्डीवर तब्बल ८ वर्षांची बंदी

दुबई : क्रिकेटमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कठोर भूमिका घेत असून, आता

India vs Sri Lanka : जसप्रीत बुमराह श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; औकिब नबीला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी

नवी दिल्ली: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी

Commonwealth Games 2026 : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप; 2030 स्पर्धेची धुरा आता भारताकडे

Commonwealth Games 2026  : ग्लासगो येथे पार पडलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा रविवारी रात्री भव्य समारोप सोहळा पार पडला.

Commonwealth Games 2026 : ग्लासगोतील रेस्टॉरंटमध्ये भारताचा अपूर्ण नकाशा; लव्हलिना बोरगोहेन यांनी व्यक्त केली नाराजी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 भारताच्या यशस्वी कामगिरीनिमित्त ग्लासगोमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आयोजित