Monday, July 13, 2026

IND vs ENG ODI : टीम इंडियाला दुहेरी धक्का! हर्षित राणा-वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे बाहेर; BCCI ने केले मोठे बदल

IND vs ENG ODI : टीम इंडियाला दुहेरी धक्का! हर्षित राणा-वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे बाहेर; BCCI ने केले मोठे बदल

- हर्षित राणाला ग्रेड-१ हॅमस्ट्रिंग दुखापत

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत दमदार विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) हे दोघेही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अनुक्रमे इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून आणि झिम्बाब्वे दौऱ्यातील टी-२० मालिकेतून बाहेर पडले आहेत. (IND vs ENG ODI)

हर्षित राणाच्या जागी प्रिन्स यादव (Prince Yadav) याची इंग्लंडविरुद्धच्या वनडे संघात निवड करण्यात आली आहे. तर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी आधीच जाहीर झालेल्या टी-२० संघात वरुण चक्रवर्तीच्या जागी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे. (IND vs ENG ODI)

हर्षित राणाला ग्रेड-१ हॅमस्ट्रिंग दुखापत :

ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात गोलंदाजी करताना हर्षित राणाला (Harshit Rana) उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगमध्ये वेदना जाणवल्या. त्यानंतर करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये त्याला ग्रेड-१ हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला आगामी वनडे मालिकेतून वगळण्यात आले असून, पुढील उपचारांसाठी तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये दाखल होणार आहे. (IND vs ENG ODI)

वरुण चक्रवर्तीही झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर :

दुसरीकडे, तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakravarthy) डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगमध्ये दुखापत झाली. एमआरआय तपासणीत त्याला ग्रेड-2 हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्याचे निदान झाले. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी तोही बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहणार आहे. (IND vs ENG ODI)

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा अद्ययावत संघ :

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार. (IND vs ENG ODI)

झिम्बाब्वे टी-२० मालिकेसाठी भारताचा अद्ययावत संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेंडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव आणि प्रवीण शेंडगे. (IND vs ENG ODI)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >