कोल्हापूर : कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात एका महिन्याच्या चिमुकलीच्या आईने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अस्मिता प्रतीकसिंह काटकर या विवाहितेने बारशाच्या कार्यक्रमापूर्वीच राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. मात्र, अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Asmita Katkar death case)
अस्मिताच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर पैशासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. लग्नानंतर सातत्याने आर्थिक मागण्या केल्या जात होत्या. वेळोवेळी रोख रक्कम आणि ऑनलाइन माध्यमातून पैसे दिल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, मुलीच्या बारशासाठी तब्बल ५२ हजार रुपयांचा पाळणा ऑनलाइन मागवला होता, मात्र त्यानंतरही कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा दावा त्यांनी केला. (Asmita Katkar death case)
मुंबई : उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील कौटुंबिक छळ व जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या ...
‘मुलगा होईल म्हणून कपडे घेतले, मुलगी झाल्याने छळ केला’ :
अस्मिताच्या आई-वडिलांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. सासरच्या मंडळींनी मुलगा होईल या अपेक्षेने मुलांचे कपडे खरेदी करून ठेवले होते. मात्र, मुलगी झाल्यानंतर अस्मिताला मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा जीव घेतला गेला आहे,” असा आरोप करत अस्मिताच्या आई-वडिलांनी सासू, सासरा, पती आणि नणंद यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. (Asmita Katkar death case)
शेवटच्या संभाषणात बारशाची होती चर्चा :
अस्मिताच्या वडिलांनी सांगितले की, शुक्रवारी (१० जुलै) मुलीशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यावेळी ती बारशाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्याबाबत बोलत होती. मात्र, रुग्णालयातील खर्च आणि इतर आर्थिक कारणांमुळे खर्चाचा ताण असल्याचे त्यांनी सांगितले होते. (Asmita Katkar death case)
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने पुन्हा एकदा धोकादायक वळण घेतले असून, मध्यपूर्वेतील तणाव कमालीचा वाढला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) ...
पोलिसांकडून तपास सुरू :
अस्मिता काटकर यांचे लग्न अवघ्या वर्षभरापूर्वी झाले होते. त्यांना एक महिन्याची मुलगी आहे. बारशाच्या काही दिवस आधीच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, मृतदेहाच्या गळ्यावर काही जखमा आढळल्याचे सांगण्यात आले आहे. विवाहितेच्या मृत्यूला सात वर्षे पूर्ण झालेली नसल्याने नियमानुसार न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील तपास केला जात आहे. (Asmita Katkar death case)
सध्या या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असून, अस्मिताच्या मृत्यूमागचे सत्य शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.





