Sunday, July 12, 2026

Pune Crime News : पुण्यात संतापजनक प्रकार! केस कापण्यासाठी गेलेल्या ४ वर्षांच्या चिमुकलीचा सलूनमध्ये विनयभंग; आरोपी अटकेत

Pune Crime News : पुण्यात संतापजनक प्रकार! केस कापण्यासाठी गेलेल्या ४ वर्षांच्या चिमुकलीचा सलूनमध्ये विनयभंग; आरोपी अटकेत

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. केस कापण्यासाठी (Haircut) सलूनमध्ये (Salon) गेलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीसोबत सलून चालकाने गैरवर्तन करत विनयभंग (Molestation) केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पारगाव पोलिसांनी (Police) तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून न्यायालयाने (Court) त्याला 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कुटुंबीयांसोबत शिंगवे येथील एका सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेली होती. त्यावेळी सलून चालक मोहम्मद फरदीन शहा याने तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांनी तात्काळ पारगाव पोलिसांकडे तक्रार (Complaint) दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा (FIR) नोंदवत आरोपीला अटक केली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुढील तपासासाठी (Investigation) त्याला 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर आंबेगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. विविध सामाजिक (Social) आणि राजकीय (Political) संघटनांनी या घटनेचा निषेध करत आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्याची मागणी केली आहे.

आंबेगाव तालुका भारतीय जनता पक्ष (भाजप) तसेच आंबेगाव तालुका नाभिक समाज सलून असोसिएशनने (Salon Association) या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तालुक्यात व्यवसाय करणाऱ्या इतर परप्रांतीय सलून व्यावसायिक आणि कामगारांची पोलिसांकडून सखोल चौकशी (Verification) व चारित्र्य पडताळणी (Background Verification) करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कायदा व सुव्यवस्था (Law and Order) राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >