मुंबई : लोणावळा-कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. दरड कोसळल्याने रेल्वे रुळांचे नुकसान झाले असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Mumbai-Pune Railway)
१७ जुलैपर्यंत ३० रेल्वे गाड्या रद्द :
मध्य रेल्वेने सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील सुमारे ३० महत्त्वाच्या रेल्वे गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. रेल्वे मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरू असून, सेवा सुरळीत होईपर्यंत प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यावर भर दिला आहे. (Mumbai-Pune Railway)
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के ...
शिवनेरी सेवांना वाढती मागणी :
सध्या एमएसआरटीसीकडून मुंबई-पुणे मार्गावर दररोज ३६ शिवनेरी बस सेवा चालवल्या जात आहेत. या सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रत्येक बसमध्ये सरासरी ५० टक्के प्रवासी संख्या नोंदवली जात आहे. मुंबई-पुणे शिवनेरी बसचे तिकीट भाडे ५१० रुपये असून, आरामदायी आणि वेळेवर प्रवासासाठी अनेक प्रवासी या सेवेला पसंती देत आहेत. (Mumbai-Pune Railway)
वीकेंडच्या पार्श्वभूमीवर बस फेऱ्या वाढवल्या :
सोमवार ते गुरुवारदरम्यान बस प्रवाशांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र, शुक्रवारपासून शनिवार-रविवारच्या प्रवासासाठी बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. (Mumbai-Pune Railway)
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) पुन्हा एकदा होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर काही ...
मागणीनुसार आणखी विशेष सेवा सुरू करणार :
एमएसआरटीसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या मागणीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. गरज भासल्यास मुंबई-पुणे मार्गावर आणखी विशेष बस सेवा सुरू करण्यात येतील. दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेल्या रेल्वे प्रवासाला आता एसटीचा आधार मिळणार असून, रेल्वे सेवा पूर्ववत होईपर्यंत प्रवाशांसाठी ही पर्यायी व्यवस्था मोठा दिलासा ठरणार आहे. (Mumbai-Pune Railway)





