Dhule crime : आईच्या सोन्यावर लेकीचा डोळा, सोन्यासाठी मुलीने केले असे काही की...

Dhule crime : धुळे शहरातील चोरीच्या घटनेनं पोलिसांनाही चक्रावून सोडले आहे. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात (West Deopur Police Station) वलवाडी परिसरात असलेल्या एका घरातून पाच लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची तक्रार एका महिलेने दाखल केली होती. मात्र पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तक्रर करणाऱ्या महिलेने आईचे सोने हडप करण्यासाठी खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार तपासात उघड झाला आहे. पोलिसांनी तक्रारदार महिलेला अटक केली असून तिच्या ताब्यातून सोने जप्त केले आहे.



नेमकं प्रकरण काय ?


ही संपूर्ण घटना धुळ्यातील वलवाडी शहरातील सुंदर नगर मधील प्लॉट क्रमांक सात येथे घडली आहे. येथे राहणाऱ्या सोनल भास्कर बागले यांनी चोरी झाल्याची फिर्याद पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात (West Deopur Police Station) दिली होती. त्यांच्या घरातून आई कस्तुरीबाई यांचे सोन्याचे मंगळसुत्र माळ, सोन्याची छोटी माळ, सोन्याच्या 2 बांगडया व सोन्याची पोत असा एकुण 5 लाख 60 हजार रु. किं.चे 90.30 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेल्याने भारतीय न्याय संहिता क. 305 (1) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे (West Deopur Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील (Jibhau Patil) यांनी या घटनेचा तपास सुरू केला. परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदार, फिर्यादी यांनी दिलेली फिर्याद आणि तपासात त्यांच्याकडे करण्यात येत असलेली विचारपुस यातील विसंगती आणि वारंवार फिर्यादी यांच्यावर पोलिसांचा संशय बळावत होता. त्यामुळे त्यांनी फिर्यादी सोनल भास्कर बागले यांच्याकडे सखोल विचारपुस केली. पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यांनतर अखेर तिने गुन्हयाची कबुली दिली.



मुलीनेच केली आईच्या दागिन्यांची चोरी


दरम्यान, गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने काढून दिल्याने हे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अशाप्रकारे फिर्यादी मुलीनेच आईचे सोने चोरीचा बनाव केल्याचं तपासात निष्पन्न झाले असून महिला आरोपीकडुन एकूण 5, लाख 60 हजार रु. किं.चे 90.30 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करुन पश्चिम देवपूर पोलीस ठाणे (West Deopur Police Station) मधील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

Jamkhed : नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्र बॉम्बने उडविण्याची धमकी; डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

जामखेड : नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत एका व्यक्तीने शिवीगाळ

USA : अमेरिकेतून ५,२०० भारतीय हद्दपार

वॉशिग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)