Crime News : अल्पवयीन मुलीचा छळ केल्याने 'पांड्या स्टोअर' फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला अटक

मुंबई : टीव्हीवर (TV) बाजीरावची (Bajirao) भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला अटक करण्यात आली. त्याने १६ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात मुंबई पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.


हा अभिनेता आहे रोहित चंदेल (Rohit Chandel). २९ वर्षीय रोहितने 'काशीबाई बाजीराव बल्लाळ'मध्ये बाजीराव आणि 'पांड्या स्टोअर'मध्ये (Pandya Store) धवल मकवाना यांची भूमिका साकारली होती. त्याच्यावर पूर्व उपनगरातील एका १६ वर्षीय मुलीचा पाठलाग करणं, तिला वारंवार फोन करणं, तिचा छळ करणं आणि तिच्यावर हल्ला केल्याचे आरोप आहेत.



पूर्व उपनगरातील एका रहिवाशाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ५ जुलै रोजी त्याने मुलीला तिच्या निवासी इमारतीजवळ गाठलं, तिचा पाठलाग केला, तिच्याशी वाद घातला, तिला शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण करून तिच्यावर हल्ला केला. पंत नगर पोलिसांनी त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पाठलाग करणे आणि दुखापत पोहोचवल्याबद्दल भारतीय न्याय संहिताच्या कलम ७८ आणि ११५ (२) चा वापर देखील केला आहे.


अल्पवयीन आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. चंदेलला शुक्रवारी त्याच्या दहिसर येथील घरातून अटक करून विशेष पॉक्सो न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.


अभिनयात येण्यापूर्वी रोहित व्यावसायिक क्रिकेट खेळायचा आणि मार्शल आर्ट्समध्येही निपुण होता. तब्बल ९० ऑडिशनमध्ये नाकारल्यानंतर त्याला २०१४ मध्ये 'बिग मॅजिक'च्या 'अकबर बिरबल' या मालिकेतून छोट्या भूमिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. 'काशीबाई बाजीराव बल्लाळ', 'पांड्या स्टोअर' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारल्या. याशिवाय हॉटस्टारवरील 'एस्केप लाईव्ह'या वेब सीरिजमध्येही त्याने काम केलं आहे.

Comments
Add Comment

Nashik : सिन्नर-नाशिक महामार्गावरील L&T फाट्यावर कंटेनर पलटी, वाहतुकीवर परिणाम

Nashik : सिन्नर-नाशिक महामार्गावर (Sinnar-Nashik Highway) एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी असलेल्या L&T फाटा येथे आज भलामोठा कंटेनर वळण घेत

Nashik : अवघ्या काही तासांत पिंपळगाव कडवा कॅनलजवळ पुन्हा दुसरा अपघात; सिन्नर तालुक्यात खळबळ

Nashik : सिन्नर तालुक्यातील पांचाळे–सोमठाणे रस्त्यावरील पिंपळगाव कडवा कॅनलजवळ आज पहाटे सुमारे ६ वाजता भीषण अपघात

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Pizza company gets fine : १० इंचाच्या ऐवजी मिळाला ७ इंचाचा पिझ्झा; ग्राहक आयोगाचा दणका, कंपनीला भरावा लागला मोठा दंड!

आजकाल ऑनलाइन जेवण मागवणे जितके सोपे झाले आहे, तितकेच त्यात फसवणुकीचे प्रकारही वाढले आह

Nashik : सिन्नर तालुक्यातील पिंपळगाव कडवा कॅनलजवळ भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Nashik : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. पांचाळे–सोमठाणे रस्त्यावर पिंपळगाव कडवा

Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर